तिसरे महायुद्ध विनाशकारी असेल आणि रशिया युक्रेनला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही, असा दावा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केला आहे. तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर केला जाईल आणि त्यामुळे विनाश पसरेल असं ते म्हणाले. तसेच रशिया युक्रेनला अण्वस्त्रे मिळू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
लावरोव्ह म्हणाले की, “रशिया कोणत्याही निर्बंधांसाठी तयार आहे. परंतु पश्चिमेकडील देश आमचे खेळाडू, पत्रकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधींना लक्ष्य करतील, हे आम्ही सहन करणार नाही.” तर युक्रेनच्या सुरक्षा सेवेद्वारे वापरल्या जाणार्या लक्ष्यांवर हल्ला करण्याची रशिया योजना आखत आहे, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय.
दोन्ही देशांमधील युद्धाचा आजचा सातवा दिवस असून रशियन सैन्याने त्यांच्या लष्करी कारवायांमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. रॉकेट आणि तोफांचा मारा तसेच गोळीबार करत युक्रेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर खार्किव्ह ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.