रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध युद्धाची घोषणा केली. आज सकाळी पुतिन यांनी युक्रेनमध्ये घुसरुन लष्करी कारवाई करण्याचे आदेश रशियन लष्कराला दिलेत. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं सांगत पुतिन यांनी युक्रेनमधील काही भागांवर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर युक्रेनची राजधानी कीव आणि आजूबाजूच्या शहरांवर हवाई हल्ले सुरु केला आहेत. या हल्ल्यांनंतर रशियन लष्कराच्या प्रवक्त्यांनी आम्ही केवळ युक्रेनच्या लष्करी तळांवर हल्ले करत आहोत. नागरी वस्ती असणाऱ्या भागांवर हल्ले केले जात नाहीय असा दावा केलाय.

एकाच वेळी रशियाने अनेक बाजूंनी युक्रेनवर आक्रमण करण्यास सुरुवात केली असून जवळजवळ २५ ठिकाणी हल्ले केले आहेत. आमच्यावर हल्ला करुन जबरदस्तीने आमच्या देशावर ताबा मिळवण्याचा हा रशियाचा आक्रमक पवित्रा आहे. आमच्या देशातील शांततापूर्ण शहरांवर रशिया सध्या सर्व बाजूंनी हल्ले करत आहे, असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय. ईशान्येकडून रशियन लष्कर देशामध्ये घुसखोरी करत असल्याचंही युक्रेननं म्हटलंय. देशाची राजधानी कीव आणि दुसरं सर्वात महत्वाचं शहर असणाऱ्या कारकीवमधील लष्करी तळांवर रशियाने मिसाइलने हल्ला केल्याचं युक्रेनच्या गृहमंत्रालयाने म्हटलंय.

Russias Voronezh radar system
चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताला रशियाची मदत! काय आहे वोरोनेझ रडार प्रणाली?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
Russia Discovers Ancient Gold Treasure in Crimea — Ukraine Considers It Looting
“ते आमचा वारसा लुटत आहेत,” युक्रेनचा आरोप; रशियाने क्रिमियामध्ये शोधला प्राचीन सोन्याचा खजिना !
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?
(Map courtesy: BNO News)

रशियाने युद्धाची घोषणा करताच युक्रेन सरकारने राजधानी कीवमधील विमानतळं रिकामं केलं आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावरुन हलवण्यात आलं आहे. रशियाने लष्करी कारवाईची घोषणा करतानाच युक्रेनची राजधानी कीव आणि पूर्वेकडील बंदरावरील शहर मारीऊपॉल येथे स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपला देश पुतीन यांनी पुकारलेल्या युद्धामध्ये आपलं रक्षण करेल आणि विजयीदेखील होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉची घोषणा केली आहे. तसंच रशियाने हल्ला सुरु केला असली तरी घाबरु नका असं आवाहन केलंय. ‘मार्शल लॉ’ घोषित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे हक्क काढून घेत देशाच्या कामकाजावर लष्कराचं नियंत्रण आणलं जातं.

नक्की वाचा >> Russia-Ukraine Crisis : पुतिन यांना इंग्रजी येतं का?; त्यांना किती आणि कोणत्या भाषा येतात?

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युक्रेनच्या राजदूतांनी रशियाने युद्ध पुकारलं असल्याची माहिती दिली. “रशियन फेडरेशनच्या राजदुतांनी तीन मिनिटांपूर्वी राष्ट्राध्यक्षांनी आमच्या देशावर युद्ध पुकारल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे,” असं त्यांनी संयुक्त राष्ट्राने तातडीने बोलावलेल्या बैठकीत सांगितलं.
रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी घोषणा केलेली विशेष कारवाई ही गेल्या कित्येत वर्षांपासून त्रास सहन करणाऱ्या युक्रेनच्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी आवाहन केलं असून मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा दिला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला असून युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. युरोपमध्ये नवं युद्ध होण्याची भीती असल्याने त्यांनी मध्यस्थीची विनंती केली आहे. महत्वाचं म्हणजे नेहमी रशियाची बाजू घेणाऱ्या चीननेही देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सीमांचा आदर करण्यासंबंधी भाष्य केलं आहे.

Story img Loader