युक्रेनची राजधानी किव्ह आणि खार्कीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मागील आठवड्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये रशियन सैन्याचीही आता दमछाक होताना दिसतेय. तरीही रशियन हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरुच आहेत. दरम्यान, सोमवारी युक्रेनने संयुक्त राष्ट्रांसमोर आपली बाजू मांडताना पुतिन यांच्या नेतृत्वाखाली युक्रेनवर युद्ध लादणाऱ्या रशियावर गंभीर आरोप केलेत. आम्ही नागरी वस्तीवर हल्ले करत नसल्याचा दावा करणाऱ्या रशियाकडून रुग्णालये, अनाथाश्रमांवर बॉम्बहल्ले केले जात असल्याचा दावा युक्रेननं केलाय.

नक्की वाचा >> Ukraine War: उच्चस्तरीय बैठकीनंतर मोदींचे युक्रेनच्या शेजारी देशांतील पंतप्रधानांना फोन; म्हणाले, “पुढील काही दिवस…”

रहिवाशी ठिकाणांवर हल्ले…
“रशियन क्षेपणास्त्रे आता आमच्या येथील मोठ्या प्रकल्पांवर, किर्णोत्सर्जन करणाऱ्या वस्तूंचे विघटन करणाऱ्या ठिकाणे, उड्डाणपूल, पाण्याच्या साठ्यांवर आणि किव्ह तसेच खार्कीव्हमधील रहिवाशी ठिकाणांवर हल्ला करत आहेत,” असं संयुक्त राष्ट्रांमधील युक्रेनच्या राजदूतांनी म्हटलंय.

tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
jharkhand assembly election 2024 amit shah attack at rahul gandhi
झारखंडमध्ये ‘राहुल विमान’ कोसळणार! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
tempo hit on Satara road, Woman died Satara road,
सातारा रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दाम्पत्य जखमी; अपघातानंतर टेम्पोचालक पसार
Putin Ukraine hating Donald Trump victory hit Europe How long will Ukraine stand strong in front of Russia
पुतिनमित्र, युक्रेनद्वेष्टे ट्रम्प यांच्या विजयाने युरोपला धडकी… रशियासमोर युक्रेन किती काळ तग धरणार?

पाच हजार सैनिक मारले…
रशियन हल्ल्यानंतर किरणोत्सर्जननाचं प्रमाणही वाढल्याचा दावा युक्रेननं केलाय. “मॉस्कोच्या आदेशाने होणाऱ्या हल्ल्यांमध्ये अनाथाश्रमे, मुलांच्या शाळा, रुग्णालये, रुग्णवाहिकांना लक्ष्य केलं जात आहे. मागील काही दिवसांमध्ये झालेल्या संघर्षात जवळजवळ पाच हजार रशियन सैनिक मारले गेलेत,” असा दावा युक्रेनन केलाय.

नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

…तर संयुक्त राष्ट्रांचा चेहरा विस्मरणात जाईल
संयुक्त राष्ट्रांनी रशियाकडे तातडीने कोणतीही अट न घालता सैन्य मागे घेण्यासंदर्भातील मागणी करावी असंही युक्रेननं म्हटलंय. त्याचप्रमाणे रशियाने डॉनेत्स्क, लुहान्स्क प्रांताना दिलेला राष्ट्रांचा दर्जा काढून त्यांचा आधीप्रमाणे युक्रेनमध्येच समावेश करावा. आता संयुक्त राष्ट्रांनी युक्रेनला मदत केली नाही तर या संघटेचे चेहरा विस्मरणात जाईल, असा इशाराही युक्रेननं दिलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: कोणी म्हणतंय हिटलर तर कोणी म्हणतंय नरकात जळणार; जगभरातील Anti-Putin मोर्चांमधील पोस्टर्स पहिलेत का?

पहिली फेरी निष्कर्षांविना…
राजधानी किव्हसह अन्य महत्त्वाच्या शहरांकडे होणाऱ्या रशियन सैन्याच्या घोडदौडीचा वेग कमी करण्यात युक्रेनच्या सैन्याला काही प्रमाणात यश आले असले तरी रशियाच्या रॉकेट हल्ल्यात सोमवारी खार्कीव्ह शहरात ११ नागरिक ठार झाले आणि मालमत्तेची मोठी पडझड झाली. दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्यातील चर्चेची पहिली फेरी कोणत्याही निष्कर्षांविना संपली असून आता लवकरच दुसऱ्या फेरीची शक्यता आहे.

नक्की पाहा >> Video: “मोदीजी एक महिना तुम्ही युपी इलेक्शनमध्ये व्यस्त होता, बायडेन यांना…”; युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थिनीचा प्रश्न

शेकडो जखमी अनेक ठार…
रशिया आणि युक्रेनमधील उच्चायुक्त पातळीवरील ही चर्चा बेलारूसच्या सीमेवर झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले नसले तरी लवकरच चर्चेची दुसरी फेरी ‘त्वरित युद्धविराम आणि युक्रेनमधून रशियन सैन्याची माघार हा युक्रेन आणि रशिया यांच्यातील शांतता चर्चेचा मुख्य उद्देश आहे’, असे युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने सोमवारी स्पष्ट केले होते.   युक्रेनच्या खार्कीव्ह शहरावरील रशियाच्या रॉकेट हल्ल्यात अनेक नागरिक ठार, तर शेकडो जखमी झाल्याची माहिती युक्रेनचे अंतर्गत सल्लागार अन्तोन हेराशेन्को यांनी समाजमाध्यमांवरील संदेशाद्वारे दिली.

नक्की पाहा >> Video: रणगाडा बंद पडल्याने अडून पडलेल्या रशियन सैनिकांजवळ येऊन युक्रेनियन चालक म्हणाला, “मी तुम्हाला…”

रशियावर निर्बंध…
रशियाने युक्रेनच्या आग्नेय झॅपोरिझ्झ्या भागातील बर्दियान्स्क आणि एनरहोदर शहरे तसेच झॅपॉरिझ्झ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या आसपासचा परिसर ताब्यात घेतल्याचे वृत्त इंटरफॅक्स या वृत्त संस्थेने रशियन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले. रशियन सैन्याने दोन लहान शहरे आणि एका अणुऊर्जा प्रकल्पाच्या सभोवतालचा भाग ताब्यात घेतला, असला तरी त्यांना अन्यत्र युक्रेनचे सैन्य जोरदार प्रतिकार करीत आहे. दुसरीकडे, रशियावर अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघाने आर्थिक निर्बंध लादल्याने त्याचाही फटका रशियन सैन्याला बसत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

मृतांची संख्या किती?
रशियाने आक्रमण केल्यापासून युक्रेनमध्ये सात मुलांसह १०२ नागरिकांचा मृत्यू आणि ३०० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी सोमवारी दिली. रशियाच्या हल्ल्यातील मृतांची संख्या सांगितली जाते त्याहून अधिक असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली.

नक्की वाचा >> Ukraine War : युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीयन महासंघाचा ऐतिहासिक निर्णय; म्हणाले, “पहिल्यांदाच आम्ही हल्ला झालेल्या…”

पाच लाख निर्वासित
युक्रेनमधून आलेल्या निर्वासितांना २७ युरोपीय देशांमध्ये तीन वर्षांपर्यंत राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार देण्याची तयारी युरोपीय महासंघ करीत असल्याची माहिती युरोपीय महासंघ आणि फ्रेंच अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थांना दिली. आतापर्यंत सुमारे तीन लाख युक्रेनियन निर्वासितांनी युरोपीय महासंघातील देशांमध्ये प्रवेश केला असून आम्हाला आणखी लाखो निर्वासितांना प्रवेश देण्याची तयारी करणे आवश्यक आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार सुमारे पाच लाख निर्वासितांनी युरोपिय महासंघाचे सदस्य असलेल्या पोलंड, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि हंगेरी या युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये आश्रय घेतला आहे.

नक्की पाहा हा व्हिडीओ >> Viral Video: युक्रेनच्या शेतकऱ्याकडून रशियन लष्कराचा टप्प्यात कार्यक्रम; ट्रॅक्टरला रणगाडा बांधला अन्…

युक्रेनला लष्करी मदत देणार
युरोपिय महासंघाच्या सदस्य देशांनी रशियावर सोमवारी नवे निर्बंध जारी केले, तर युक्रेनला अधिक लष्करी मदतीची ग्वाही दिली. अमेरिका आणि जर्मनीने युक्रेनला स्टिगर क्षेपणास्त्रे पाठवण्याची घोषणा केली. रशियन हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी आम्ही युक्रेनला लढाऊ विमानेही पाठवू शकतो, असे युरोपीय महासंघाचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी रविवारी म्हटले होते.