Digital Arrest Scam : गेल्या काही दिवसांपासून देशात डिजीटल अरेस्टच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यादरम्यान गुरूवारी गुजरातच्या अहमदाबाद सायबर क्राइम पोलिसांनी एक रशियन नागरिकाला अशाच एका प्रकरणात अटक केली आहे. अनातोली अलेक्झांड्रोविच मिरोनोव्ह (Anatoliy Alexandrovich Mironov) असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे
फोनवर पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करून आणि तक्रारदाराला डिजिटल अरेस्ट करत त्याची १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन भारतीय नागरिकांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. नदीमखान पठाण आणि मेहफूजालम उर्फ इम्रान मसूदालम शाह असे या दोघांची नावे आहेत.
पुण्यातही गुन्हा दाखल
अधिकृत निवेदनानुसार गुरूवारी रशियाचा नागरिक असेला मिरोनोव्ह हा सध्या महाराष्ट्रातील पुणे शहरात राहतो. याच्याविरोधात पिंपरी चिंचवड येथील पोलिसी स्थानकात देखील गुन्हा दाखल आहे. अज्ञात व्यक्तींनी फसवणुकीसंबंधी कट रचला होता आणि पीडित व्यक्तीला दिल्ली पोलिस मुख्यालयातून कस्टम इन्स्पेक्टर बोलत असल्याचा फोन केला होता .
काय म्हणून फसवलं?
आरोपींनी पीडित व्यक्तीच्या नावाने मलेशियाला पाठवलेले एक पार्सल सापडले असून त्यात १६ बनावट पासपोर्ट, ५८ एटीएम कार्ड आणि १४० ग्रॅम एमडीएम ड्रग्ज यांसारख्या बेकायदेशीर वस्तू आढळल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित व्यक्तीच्या बँक खात्यातून कोणीतरी मनी लाँड्रिंग केले असल्याचे खोटे सांगून पीडित व्यक्तीला भीती घातली. त्यानंतर आरोपींनी दिल्लीतील वसंत कुंज पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी असल्याचा बनाव रचून पीडित व्यक्तीला डिजीटल अरेस्ट केले.
हेही वाचा>> ‘लेक असावी तर अशी… ‘ पहिल्यांदा आईला घेऊन गेली पार्लरला अन्… Viral Video तून पाहा ‘तिच्या’ चेहऱ्यावरील आनंद
त्यानंतर पीडित व्यक्तीने आपली बँक डिटेल्स त्यांना पाठवल्या,मग आरोपींनी त्याच्या खात्यातून १७ लाख रुपये चोरी केले. त्यानंतर सायबर क्राईम पोलिसांनी पठाणला याला अटक केली होती. पठाण यानेच चोरलेली रक्कम हस्तांतरित करण्यासाठी अनेक बँक खाती तयार केल्याचा आरोप आहे. कथित चीनमधील बॉसच्या आदेशानुसार चोरलेल्या रकमेपैकी काही क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर केल्याचा आरोप देखील पठाण याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.