योगासने हा धार्मिक पंथाशी संबंधित प्रकार असल्याचे सांगून रशियाच्या अधिकाऱ्यांनी योगावर बंदी घातली असून योगासनांचे वर्ग चालवणाऱ्यांची धरपकडही केली आहे. निझनेवारस्तोक येथे दोन योगासन वर्गाना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांना पालिकेच्या इमारतीत योगासनांचे वर्ग घेऊ नयेत, असे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे. ऑरा व इनग्रा अशा दोन ठिकाणी हटयोगाचे वर्ग घेतले जात होते. युरोपात हटयोग फार लोकप्रिय असतानाही हे छापे टाकण्यात आले आहेत.
‘द मॉस्को टाइम्स’ ने दिलेल्या वृत्तानुसार दोन वर्गाना मिळालेल्या पत्रात म्हटले आहे की, योगासने ही धार्मिक पंथाशी संबंधित असून ती बंद करावीत.
युरोपात योग लोकप्रिय
‘द योग जर्नल’ या नियतकालिकाने केलेल्या अभ्यासानुसार २०१२ मध्ये अमेरिकेतील २०.४ दशलक्ष लोक योगासने करीत होते व अनेक युरोपीय देशात नियमितपणे योगासने करणारे लोक आहेत.

Story img Loader