रशियातील विरोधी पक्षातील नेते आणि राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे विरोधक एलेक्सी नवलनी (Alexei Navalny) सायबेरियावरुन मॉस्कोला परत येत असतानाच विमानामध्येच आजारी पडले होते. त्यांना विमानातच उटल्या आणि मळमळण्याचा त्रास होऊ लागला. एलेक्सी यांची प्रकृती बिघडल्याने विमानाला इमर्जन्सी लॅण्डींग करावं आणि त्यांना ओमस्क इमर्जन्सी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता जर्मनीने एलेक्सी यांना नोविचोक (Novichok) नावाचे विष देण्यात आलं होतं असा दावा केला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘असोसिएट प्रेस’ने दिलं आहे. एलेक्सी सध्या कोमामध्ये आहेत.

एलेक्सी यांना चहामधून विष देण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता यासंदर्भात एक खळबळजन दावा करण्यात आला आहे. जर्मनीमध्ये राहणारे सोव्हिएत संघाचे अस्तित्व असताना वैज्ञानिक म्हणून काम करणारे व्लादिमीर उग्लेव यांनी एलेक्सी यांच्यावर कपड्यांच्या माध्यमातून विषप्रयोग करण्यात आलाचा दावा केला आहे. नोविचोकसारखेच  विष एलेक्सी यांच्या अंडरवेअर, अंडरशर्ट किंवा सॉक्सवर शिंपडण्यात आले आणि त्या माध्यमातून त्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज उग्लेव यांनी व्यक्त केला आहे. शरीराचा कोणाताही भाग या विषाच्या संपर्कात आल्यास त्याची बाधा होते. विषप्रयोग करण्याच्या हेतूने कोणीतरी हे विष एलेक्सी यांच्या कपड्यांवर शिंपडल्याचा आरोप उग्लेव यांनी केल्याचे डेली मेलने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

karnataka cm siddaramaiah
‘मुदा’ घोटाळाप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; तक्रारदाराचा आरोप, ईडीकडे कारवाईची मागणी
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Israel war attack against Hezbollah continues
इस्रायलचा युद्धविरामास नकार,अमेरिकेसह मित्रदेशांचा प्रस्ताव धुडकावला; हेजबोलाविरोधात संघर्ष सुरूच
Hezbollahs influence hasan nasarullah
“लेबनॉनवर हल्ले म्हणजे युद्धाची घोषणा”; हिजबुलच्या प्रमुख नेत्याचं वक्तव्य, कोण आहेत हसन नसराल्लाह?
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
donald trump assassination attempt,
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न? फ्लोरिडातील गोल्फ क्लबबाहेर गोळीबार; हल्लेखोर अटकेत!

७३ वर्षीय उग्लेव यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणाऱ्या कोणत्याही एजंटला एलेक्सी यांच्या रुमपर्यंत पोहचणे सहज शक्य होतं. अशीच एखादी व्यक्ती एलेक्सी यांच्या रुममध्ये गेली आणि तिने एलेक्सी यांच्या अंतर्वस्त्रावर विष शिंपडले. एलेक्सी यांनी कपडे घातल्यानंतर विषाचा त्वचेशी थेट संबंध आल्याने विषबाधा झाली आणि विष शरीरभर पसरले असं उग्लेव यांनी म्हटलं आहे.

नोविचोक या विषाची पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी जागतिक स्तरावर चर्चा झाली होती. त्यावेळी ब्रिटनमध्ये राहणारे आणि पूर्वी गुप्तचर यंत्रणांसाठी काम करणाऱ्या सर्गेई स्क्रिपल आणि त्यांच्या मुलीला ठार मारण्यासाठी हे विष वापरण्यात आलं होतं. नोविचोक हे विशेष प्रकराचे रसायन असून त्याचा वापर केमिकल वेपन म्हणून केला जातो. या विषाचा वापर केल्यानंतर त्याचा माग काढणं सहज शक्य होतं नाही. शीत युद्धादरम्यान सोव्हिएत संघाच्या फोलिएंट नावाच्या लष्करी मोहिमेदरम्यान हे रासायनिक हत्यार तयार करण्यात आलं होतं. हे चौथ्या पिढीचे म्हणजे अंत्यत जालीम असे विष आहे. १९७९ ते १९८० च्या कालावधीमध्ये तयार करण्यात आलेलं हे रसायन थेट चेतनासंस्थेवर (नर्व्हस सिस्टीमवर) परिणाम करते.

मागील वर्षी एलेक्सी यांना तुरुंगवासात ठेवण्यात आलं होतं. त्यावेळीही त्यांना विषबाधेमुळे रुग्णालयात दाखल कऱण्यात आलेलं. मात्र डॉक्टरांनी तो अॅलर्जिटीक अटॅक होता असं सांगून दुसऱ्याच दिवशी एलेक्सी यांना पुन्हा तुरुंगात पाठवलं होतं. एलेक्सी यांनी रशियामधील भ्रष्टाचाराविरोधामध्ये लढण्यासाठी एका फाउंडेशनची स्थापना केली होती. मात्र मागील महिन्यामध्ये एका बड्या व्यवसायिकाने दाखल केलेल्या खटल्यानंतर हे फाउंडेशन बंद करण्यात आलं. २०१८ साली एलेक्सी हे पुतिन यांच्याविरोधात निवडणूक लढवणार होते मात्र त्यांना निवडणूक लढवता आली नाही. ते रशियामधील सरकारला विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

अनेक वर्षांपासून एलेक्सी हे रशियामधील अगदी स्थानिक निवडणुकांपासून मोठ्या निवडणुकांपर्यंत सर्व ठिकाणी सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षाच्या उमेदवारांविरोधात उभ्या असणाऱ्यांना मदत करत आहेत. रशियामध्ये सरकारला विरोध करणाऱ्या इतर नेत्यांप्रमाणे एलेक्सी यांनाही अनेकदा अटक कऱण्यात आली होती. २०१७ साली एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला करुन त्यांच्या चेहऱ्यावर अ‍ॅण्टीसेप्टीक फेकलं होतं. त्यावेळी त्यांच्या एक डोळ्याला दुखापत झाली होती.