रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं यात मोठं प्रमाण आहे. याच पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील भारतीयांच्या सुरक्षेबाबत भारताला आश्वासन दिलंय. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुरक्षित आणणं शक्य होणार आहे. आज (२६ फेब्रुवारी) युक्रेनमधील भारतीयांना ४ विमानांच्या माध्यमातून मायदेशी आणलं जात आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रस्त्याच्या मार्गे रोमानिया आणि हंगेरीत आणण्यात आलंय. पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचं आश्वासन दिल्यानंतर युक्रेनच्या पश्चिम सीमेकडून भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. पुतीन यांनी रशियाच्या सुरक्षा दलाला भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत. यानंतरच भारतीय दुतावासाने युक्रेनमधील भारतीयांना सुरक्षित ठिकाणी जाताना वाहनांवर भारताचा तिरंगा ध्वज लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

युक्रेनमध्ये सध्या १६ हजार भारतीय नागरिक मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) सायंकाळी २०० भारतीयांना युक्रेनमधून रोमानियात आणलं गेलं. आज (२६ फेब्रुवारी) रोमानियातून २१९ प्रवाशांना घेऊन पहिलं विमान मुंबईत दाखल होणार आहे. याशिवाय २ विमानं युक्रेनमधील ४९० प्रवाशांना घेऊन राजधानी दिल्लीत पोहचणार आहे.

२१९ भारतीयांना घेऊन रोमानियाहून निघालेल्या पहिल्या विमानाने मुंबईकडे घेतली भरारी

युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलेल्या २१९ भारतीयांना घेऊन, मुंबईला येणारे पहिले विमान रोमानियाहून निघाले आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या २१९ भारतीयांसह मुंबईला जाणारे पहिले विमान रोमानियाहून निघाले आहे. ते म्हणाले, ‘आम्ही प्रगती करत आहोत. आमचं पथक २४ तास कार्यरत आहे. मी वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

आता या सर्व भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या लोकाना प्रथम रस्ते मार्गाने युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवले जाईल. त्यानंतर तेथून एअर इंडियाच्या विशेष विमानांनी त्यांना भारतात परत आणले जाईल. अशी पहिली निर्वासन उड्डाणे आज रोमानिया आणि हंगेरीला पाठवण्यात आली आहेत. भारताने हंगेरी, पोलंड, स्लोव्हाक प्रजासत्ताक आणि रोमानिया यांच्याशी युक्रेनच्या सीमेवरून आपल्या नागरिकांना रस्ते मार्गाने बाहेर काढण्यासाठी चर्चा केली आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी दिल्लीहून बुखारेस्टला निघालेले एअर इंडियाचे विमान रविवारी रात्री १.५० वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचेल. त्याचप्रमाणे दुसरे विमान आज दुपारी ४.१५ वाजता दिल्ली विमानतळावरून निघेल आणि रविवारी सकाळी ७.४० वाजता दिल्लीला परत पोहोचेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधून येणारे विमान आज दिल्लीत येण्याची शक्यता खूपच कमी आहे. उद्या दिल्लीला पोहोचणाऱ्या दोन्ही विमानांमधून सुमारे ४९० प्रवाशांना दिल्लीत आणले जाणार आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. तर एअर इंडियाचे विमान बुखारेस्ट, रोमानिया येथे उतरले असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

मुंबई विमानतळावर सर्व तयारी पूर्ण –

युक्रेनमधून येणाऱ्या भारतीयांसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जेणेकरून युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सहज पाठवता येईल. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे AI1944 हे विमान आज मुंबईत पोहोचत आहे. सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विमानतळ आरोग्य संघटना (APHO) टीम विमानतळावर प्रवाशांच्या आरोग्याची तपासणी करेल.

हेही वाचा : Video: …अन् रशियन रणगाड्याने भररस्त्यात धावत्या कारला चिरडलं; अंगावर काटा आणणारा घटनाक्रम कॅमेरात कैद

प्रवाशांना कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र किंवा नकारात्मक आरटी-पीसीआर अहवाल दाखवावा लागेल. जर कोणाकडे दोन्हीपैकी एक नसेल तर त्याची विमानतळावरच आरटी-पीसीआर चाचणी होईल. त्याचा खर्च विमानतळ उचलणार आहे. जर एखादा प्रवासी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आढळला, तर त्याच्यावर विहित कोविड प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील. याशिवाय, युक्रेनमधून मुंबईत विमानतळावर येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बसण्याची जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. त्यांना येथे मोफत वायफाय, जेवण आणि पाण्याच्या बाटल्याही दिल्या जाणार आहेत. या सर्वांना आवश्यक ती सर्व मदत मिळेल.