पीटीआय, मॉस्को
युक्रेन संघर्षाबाबत भारताच्या सतत संपर्कात आहे. भारतासह चीन व ब्राझील हे तीन देश हा संघर्ष सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सांगितले.व्लादिवोस्तोक येथे ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत पुतिन यांनी हे वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन आठवड्यांपूर्वी युक्रेनचा दौरा केला होता. आमच्या मित्र आणि सहकाऱ्यांचा मी आदर करतो. त्यांची हा संघर्ष थांबावा ही प्रामाणिक इच्छा आहे, असे पुतिन यांनी या देशांचा संदर्भ देत नमूद केले.
याखेरीज रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते डिमिर्टी पेस्कोव्ह यांनीही युक्रेनशी संवाद साधण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो हे स्पष्ट केले. मोदी व पुतिन यांचे सौहार्दाचे संबंध पाहता, मोदी याबाबत पुढाकार घेऊ शकतील असे त्यांनी सांगितले. जागतिक समुदायात एक स्थान निर्माण करण्याची याद्वारे भारताला संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.२०२२ मध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा तुर्कस्तानने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यासंबंधी कराराच्या अटींची कधीच अंमलबजावणी झाली नाही. आता पूर्वीचे प्रयत्न नव्याने चर्चा सुरू करण्यासाठी आधार म्हणून वापरले जाऊ शकतात, असे पुतीन यांनी यावेळी सांगितले.
© The Indian Express (P) Ltd