Russia Ukraine Conflict News: रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली. रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. पुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करणार सांगतना या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असंही सांगितलं. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असंही सांगितलं. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा विरोध केला असून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला असून आणखी निर्बंध लावले जातील असं स्पष्ट केलं आहे. तर संयुक्त राष्ट्राने रशियाला शांतता ठेवण्यासाठी आवाहन केलं आहे. दुसरीकडे भारतानेही भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी आवाहन केलं असून मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा दिला आहे. युक्रेनने युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे विनंती केली असून देशात मार्शल लॉ लागू केला आहे.

Live Updates

Russia Ukraine War: पुतिन यांनी अमेरिकेसह युरोपला मधे पडाल तर वाईट परिणाम भोगावे लागतील असा धमकीवजा इशाराच दिला आहे.

11:49 (IST) 24 Feb 2022
रुपया ५५ पैशांनी घसरला

रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा केल्याने रुपयालादेखील फटका बसला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ पैशांनी घसरला असून ७५.१६ वर पोहोचला आहे.

11:45 (IST) 24 Feb 2022
बायडन यांची रशियाला धमकी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला जी ७ तसंच इतर सहकारी देशांकडून अनेक निर्बंध लावण्याची धमकी देण्यात आली आहे.

11:43 (IST) 24 Feb 2022
युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले

युक्रेनमध्ये बॉम्बहल्ले सुरु असल्याचा व्हिडीओ

11:36 (IST) 24 Feb 2022
युक्रेनने रशियाची लष्करी विमानं पाडली

युक्रेनने रशियाच्या एअर स्ट्राइकला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रशियाची पाच लष्करी विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडले असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

11:05 (IST) 24 Feb 2022
“तुम्ही एकटे नाही,” संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युक्रेनला देशांचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला असून युक्रेनला पाठिंबा दर्शवला आहे. युरोपमध्ये नवं युद्ध होण्याची भीती असल्याने त्यांनी मध्यस्थीची विनंती केली आहे. महत्वाचं म्हणजे नेहमी रशियाची बाजू घेणाऱ्या चीननेही देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सीमांचा आदर करण्यासंबंधी भाष्य केलं आहे.

11:02 (IST) 24 Feb 2022
युक्रेनध्ये एअर रेड सायरन वाजला

युक्रेनची राजधानी कीवमध्ये शहर हल्ल्याखाली असल्याचं दर्शवणारे एअर रेड सायरन्स वाजले आहेत.

10:59 (IST) 24 Feb 2022
रशिया-युक्रेन संघर्षातील जर्मन दुवा – काय आहे नॉर्ड स्ट्रीम-२ पाइपलाइन?

युक्रेनमधून थेट जर्मनीपर्यंत जाणाऱ्या नॉर्ड स्ट्रीम – २ या वायूवाहिनी किंवा गॅस पाइपलाइनच्या मुद्द्यावरून हा संघर्ष सुरू झाल्याचा एक मतप्रवाह आहे. रशियातील नैसर्गिक वायू आणि इतर जीवाश्म इंधने अशा प्रकारे पाइपलाइनच्या माध्यमातून पश्चिम आणि दक्षिण युरोपभर पोहोचली, तर रशियाचे युरोपातील महत्त्व कितीतरी वाढेल अशी भीती वाटल्यामुळेच अमेरिकेने हा वाद उकरून काढल्याची टीका रशियावादी विश्लेषक करतात. नॉर्ड स्ट्रीम – २ पाइपलाइन त्यामुळेच चर्चेच्या केंद्रस्थानी आलेली आहे.

सविस्तर बातमी

10:56 (IST) 24 Feb 2022
रशिया-युक्रेनच्या युद्धामुळे खिशाला बसणार फटका; भारतात ‘या’ गोष्टी महागणार

रशिया-युक्रेनच्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगासह भारतातही पहायला मिळणार आहेत. या युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. कोणत्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात, याबद्दल तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. यामध्ये नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल, गहू, धातू महाग होऊ शकतं. तर एलपीजी, केरोसीन अनुदान वाढू शकतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा

10:50 (IST) 24 Feb 2022
युक्रेनकडून ‘मार्शल लॉ’ची घोषणा; नागरिकांना केलं आवाहन

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉची घोषणा केली आहे. तसंच रशियाने हल्ला सुरु केला असली तरी घाबरु नका असं आवाहन केल्याचं वृत्त AP ने दिलं आहे. 'मार्शल लॉ' घोषित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे हक्क काढून घेत देशाच्या कामकाजावर लष्कराचं नियंत्रण आणलं जातं.

10:46 (IST) 24 Feb 2022
युक्रेनच्या राजधानीतील सध्याची स्थिती

युक्रेनची राजधानी कीवच्या एअरस्पेसची स्थिती

10:32 (IST) 24 Feb 2022
युक्रेनमधून विशेष विमान दिल्लीत दाखल

युक्रेनमधील भारतीयांना घेऊन येणारं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

10:28 (IST) 24 Feb 2022
संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत रशियाने पुकारलेल्या युद्धावर शिक्कामोर्तब

संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युक्रेनच्या राजदूतांनी रशियाने युद्ध पुकारलं असल्याची माहिती दिली. “रशियन फेडरेशनच्या राजदुतांनी तीन मिनिटांपूर्वी राष्ट्राध्यक्षांनी आमच्या देशावर युद्ध पुकारल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे,” असं त्यांनी संयुक्त राष्ट्राने तातडीने बोलावलेल्या बैठकीत सांगितलं.

10:25 (IST) 24 Feb 2022
“युक्रेन आपलं रक्षणही करेल आणि विजयीदेखील होईल”

युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपला देश पुतीन यांनी पुकारलेल्या युद्धामध्ये आपलं रक्षण करेल आणि विजयीदेखील होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

10:17 (IST) 24 Feb 2022
युक्रेनने राजधानी कीवमधील विमानतळ केलं रिकामं

रशियाने युद्धाची घोषणा करताच युक्रेन सरकारने राजधानी कीवमधील विमानतळं रिकाम केलं आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावरुन हलवलं जात आहे.

10:14 (IST) 24 Feb 2022
युक्रेन मार्शल कायदा लावण्याच्या तयारीत

युक्रेनमध्ये मार्शल कायदा लावला जाऊ शकतो. त्याप्रमाणे तयारी सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिली आहे.

09:58 (IST) 24 Feb 2022
संयुक्त राष्ट्राकडे युक्रेनची युद्ध थांबवण्यासाठी विनंती

युक्रेनने संयुक्त राष्ट्राकडे युद्ध थांबवण्यासाठी विनंती केली आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धाची घोषणा केली असताना हे युद्ध थांबवणं संयुक्ता राष्ट्राची जबाबदारी असल्याचं युक्रेनने म्हटलं आहे.

09:56 (IST) 24 Feb 2022
युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज

रशियाने लष्करी कारवाईची घोषणा करतानाच युक्रेनची राजधानी Kyiv आणि पूर्वेकडील बंदरावरील शहर Mariupol येथे स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. तेथील नागरिकांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर केले आहेत.

09:53 (IST) 24 Feb 2022
युक्रेनच्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी विशेष ऑपरेशन – रशिया

रशियाने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत बोलताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी घोषणा केलेली विशेष कारवाई ही गेल्या कित्येत वर्षांपासून त्रास सहन करणाऱ्या युक्रेनच्या नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी असल्याचं म्हटलं आहे. UN चार्टरच्या अनुच्छेद 51 च्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेतला असून युक्रेनमधील परिस्थितीची पडताळणी करु असंही सांगितलं आहे.

09:48 (IST) 24 Feb 2022
भारताने सैन्य मागे घेण्यासाठी केलं आवाहन

भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी आवाहन केलं असून मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा दिला आहे.

09:45 (IST) 24 Feb 2022
युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज

युक्रेनच्या राजधानीपासून ४८० किमी अंतरावर असणाऱ्या दुसरं सर्वात मोठं शहर Kharkiv मध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत. आज सकाळी युक्रेनच्या नागरिकांनी एक वेगळा देश पहायला मिळत असल्याचं CNN च्या रिपोर्टरने सांगितलं. युक्रेनमध्ये सध्या पहाटेचे ५ वाजून ५० मिनिटं झाली आहेत. भारतातील वेळ साडे तीन तासांनी पुढे आहे.

09:41 (IST) 24 Feb 2022
शांततेला एक संधी द्या, संयुक्त राष्ट्राच्या प्रमुखांचं आवाहन

संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेनमध्ये लष्कर पाठवू नका असं आवाहन करताना शांततेता एक संधी द्या अशी विनंती केली आहे.

(Photo: UNTV via AP)

AP ने दिलेल्या वृत्तानुसार, रशिया युक्रेनमध्ये घुसखोरी करेल यावर मी विश्वास ठेवला नव्हता आणि काहीही गंभीर होणार नाही असं स्वत:लाच सांगितलं होतं. पण मी चुकीचा ठरलो आहे आणि मला पुन्हा चुकीचं ठरायला आवडेल. मला पुतिन यांना युक्रेनमध्ये निघालेलं सैन्य थांबवा असं मनापासून सांगायचं आहे. आधीच अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे असंही ते म्हणाले.

09:31 (IST) 24 Feb 2022
विनाशकारी परिणाम होतील, अमेरिकेचा रशियाला गर्भित इशारा

रशियाने युद्ध पुकारताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विनाशकारी परिणाम होतील असा गर्भित इशारा दिला आहे. या हल्ल्यामुळे होणारी हानी आणि मृत्यू यासाठी रशिया एकटी जबाबदार असेल असंही ते म्हणाले आहेत. तसंच अमेरिका आपल्या सहकारी देशांसह याचं उत्तर देईल असंही म्हणाले आहेत. जग रशियाला जबाबदार धरेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

09:24 (IST) 24 Feb 2022
शेअर बाजार गडगडला

रशियाने युद्ध पुकारताच शेअर बाजारवर परिणाम पहायला मिळत आहेत. सेन्सेक्स हजार अंकांनी गडगडला आहे.

09:23 (IST) 24 Feb 2022
खनिज तेलाचे भाव १०० डॉलर प्रति बॅरल

रशियाने युद्ध पुकारलं असल्याने खनिज तेलाचे भाव १०० डॉलर प्रति बॅरल पार गेले आहेत. यामुळे जगभरात इंधन महागणार आहे.

09:12 (IST) 24 Feb 2022
युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज

युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये स्फोट झाल्याचे आवाज ऐकू येत आहेत. यामध्ये राजधानी कीवचाही समावेश असल्याचं वृत्त The Spectator Index ने दिलं आहे.

09:09 (IST) 24 Feb 2022
रशियाकडून लष्करी कारवाईला सुरुवात

रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाईला सुरुवात केल्याचं वृत्त एएफपीने दिलं आहे.

09:07 (IST) 24 Feb 2022
अमेरिकेचे रशियावर नवे व्यापार निर्बंध

युक्रेनच्या काही भागांत सैन्य पाठवण्याचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा निर्णय म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडउघड उल्लंघन’ असल्याचे सांगून, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियावर व्यापार निर्बंध लागू केले आहेत. पाश्चिमात्य देशांशी व्यापार करण्याच्या रशियाच्या क्षमतेला यातून लक्ष्य करण्यात आले आहे.

09:05 (IST) 24 Feb 2022
शस्त्र टाका अन्यथा रक्तपात अटळ

पुतीन यांनी युक्रेनला इशारा देताना शस्त्र टाका अन्यथा रक्तपात अटळ असल्याचा इशारा दिला आहे.

09:03 (IST) 24 Feb 2022
पुतिन यांची इतर देशांना धमकी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाईची घोषणा करताना धमकीही दिली आहे. यात त्यांनी सांगितलं आहे की, “यामध्ये पडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. इतिहासात कधीच भोगावे लागले नाहीत अशा परिणामांना सामोरं जावं लागले. सर्व महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. तुम्ही मला ऐकलं असेल अशी आशा आहे”.

रशियाच्या लष्करी बळाचा वापर आपल्या देशाबाहेर करण्याचा अधिकार अध्यक्ष पुतिन यांना मिळाल्यानंतर आणि पाश्चिमात्य देशांनी अनेक निर्बंध लादून त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर तणाव नाटय़मयरीत्या वाढला होता. यानंतर, युक्रेनने आपल्या नागरिकांना रशिया सोडण्याचे आवाहन केले होते. युरोपनेही बुधवारी आणखी संघर्षांची तयारी केली होती. गेले अनेक आठवडे शांतता असल्याचे दर्शवल्यानंतर युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी वाढती चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना रशियात न जाण्याचा सल्ला दिला, तसेच तेथे कुणी असेल तर त्याने तत्काळ तेथून परतावे अशी शिफारस केली.

हे युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्र प्रयत्न करत असून रशियाला सैन्य मागे घेत शांततेला एक संधी देण्याची विनंती केली आहे.