रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीयांचे पुन्हा एकदा तौंडभरून कौतुक केले आहे. भारतातील लोक हे प्रतिभावान आहेत. देशाचा विकास घडवून आणण्यात त्यांच्यात मोठी क्षमता आहे, असे पुतिन म्हणाले आहेत. ते ४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणाऱ्या रशियन एकदा दिवसाच्या (रशियन यूनिटी डे) एका कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा >>> First Voter of Independent India : स्वतंत्र भारतामधील पहिले मतदार शाम शरण नेगी यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी निधन
“भारत देशाकडे बघा. भारतातील लोक हे समर्पित आणि प्रतिभावन आहेत. भारत देश आकामी काळात विकासाच्या बाबतीत नक्कीच उत्तम कामगिरी करणार, यात कसलीही शंका नाही,” असे पुतिन म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> Gujarat Assembly Election 2022 : निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’ला धक्का; इंद्रनील राजगुरूंची काँग्रेसमध्ये घरवापसी
याआधी पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा केली होती. आगामी काळात जागतिक घडामोडींमध्ये भारताच्या भूमिकेचे महत्त्व वाढणार आहे. भविष्यकाळा हा भारताचा असेल, असे ते म्हणाले होते.
येणाऱ्या ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर शियाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात ते रशियाचे परराष्ट्रमंत्री सेरगेई लावरोव यांची भेट घेणार आहेत. या दोन नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होणार आहे. तसेच रशियाचे व्यापार आणि उद्योग मंत्री यांचीदेखील तेl भेट घेतील. दोन देशांमधील आर्थिक सहकार्याबद्दल या भेटीत चर्चा होणार आहे. जयशंकर यांच्या रशिया दौऱ्याच्या अगोदर पुतिन यांनी भारताची वाहवा केली आहे.
हेही वाचा >>> राजस्थानमध्ये सचिन पायलट पुन्हा आक्रमक, काँग्रेसचे नवे अध्यक्ष तोडगा काढण्यात यशस्वी होणार?
दरम्यान, भारत आणि रशिया हे देश एकमेकांचे दीर्घकालीन मित्र आहेत. रशिया-युक्रेन युद्धात जगभरातून रशियावर टीका केली जात असताना. भारताने याबाबतीत तटस्थतेची भूमिका घेतलेली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर चर्चा आणि मुत्सद्देगीरीच्या माध्यमातून तोडगा काढायला हवा, असे भारताचे मत आहे. तसेच युद्धामुळे अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादलेले आहेत. असे असले तरी भारत देश रशियाकडून सवलतीत मिळणारे कच्चे तेल आणि कोळश्याची आयात करत आहे.