उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर आता विविध स्तरातून प्रतिक्रियादेखील उमटू लागल्या आहेत. रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Hathras Stampede : “क्षमतेपेक्षा अधिक लोक जमले, भोले बाबांचा स्पर्श झालेली माती घेण्यासाठी गर्दी झाली”, FIR मधून धक्कादायक खुलासे!

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Amit Shah Rally cancle
Amit Shah Rally: अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील सर्व सभा रद्द; शेवटच्या दिवसांत प्रचार करणार नाहीत, मणिपूरमध्ये परिस्थिती चिघळल्यानंतर निर्णय
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Dehradun Car Accident
Dehradun accident: पार्टी केली, मग शर्यत लावली; उत्तराखंडमध्ये भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी

भारतातील रशियाच्या दुतावासाकडून एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोकसंदेश पाठवला आहे, असं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेत आतापर्यंत १२० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये महिला आणि मुलांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मंगळवारी हाथरस एका सत्संगादरम्यान ही चेंगराचेंगरीची घटना घडली. यासंदर्भात बोलताना, “या कार्यक्रमात अपेक्षेपेक्षा हजारो लोक आले होते. भोले बाबांनी सत्संगस्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्याकरता गर्दी जमली. त्यासाठी लोक जमिनीवर पसरले होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत भाविक जवळ असलेल्या नाल्यात पडले,” अशी माहिती उत्तर प्रदेशचे महासचिव मनोज कुमार सिंग यांनी दिली.

हेही वाचा – चेंगराचेंगरीत ११६ ठार; उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगात दुर्घटना

याप्रकरणी आता आयोजकांविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आयोजकाने या कार्यक्रमात सुमारे ८० हजार भाविकांना एकत्र येण्यासाठी परवानगी मागितली होती. परंतु, या संस्थेने यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी लाखो भाविक जमले होते हे उघड केले नव्हते. तसंच, मंगळवारच्या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यांतून आणि जवळपासच्या राज्यांतून सुमारे अडीच लाख लोक जमले होते. परवानगीच्या अटींचे पालन न केल्याने जीटी रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती, असं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.