रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतीच दरवर्षाप्रमाणे या वर्षाच्या शेवटीही प्रदीर्घ पत्रकार परिषद घेतली. पुतिन यांची ही पत्रकार परिषद तब्बल चार तास सुरु होती. या पत्रकार परिषदेमध्ये पुतिन यांनी अनेक विषयांवर भाष्य केल्याचं पहायला मिळालं. पुतीन यांनी तब्बल चार तास घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर जगातील वेगवेगळ्या देशांमधून त्यांचं कौतुक केलं जात आहे. एकीकडे आमचे नेते पाच प्रश्नांनाही उत्तर देऊ शकत नसताना हा नेता चार तास पत्रकारांच्या प्रश्नाला सामोरे जातो हे कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त करण्यात आलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुतिन यांनी पत्रकार परिषदेमध्ये युक्रेनवरुन पाश्चिमात्य देशांना थेट इशारा दिला. नाटोचा विस्तार युक्रेनपर्यंत करुन सुरक्षेची हमी देण्याची आपली मागणी पूर्ण केली जात नसेल तर आपण वेगळ्या मार्गांचा विचार करु असं पुतिन म्हणाले आहेत. मध्य पूर्व युरोपमध्ये नाटोने तैनात केलेले सैन्य मागे घ्यावं अशी मागणी काही आठवड्यापूर्वी रशियाने केलेली. पाश्चिमात्य देशांनी आमच्यासंदर्भात आक्रमक भूमिका कायम ठेवली तर आम्ही सुद्धा योग्य ती लष्करी आणि व्यापारी पावलं उचलू असं पुतिन म्हणाले. रशियाच्या सरकारी वृत्तवाहिनीवरुन पुतिन यांची पत्रकार परिषद लाइव्ह दाखवण्यात आली.

पुतिन यांची ही पत्रकार परिषद तब्बल चार तास सुरु होती. यासंदर्भात अनेक पत्रकारांनी ट्विटरवरुन पोस्ट केलं आहे. करोना नियमांमुळे पुतिन हे पत्रकारांपासून काही अंतरावर बसले होते. मात्र त्यांना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची त्यांनी रोखठोकपणे उत्तरे दिल्याचं पहायला मिळालं. पुतिन यांच्या या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांबरोबरच त्यांनी देशाचा नेता म्हणून प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना सलग चार तास उत्तरं दिल्याचं पाहून अमेरिका तसेच भारतासारख्या सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील नागरिकांनीही आमच्या नेत्यांनी अशी हिंमत दाखवणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केल्याची काही उदाहरणं ट्विटरवर पहायला मिळत आहेत.
आमचे राष्ट्राध्यक्ष तर…

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवरही साधला निशाणा

मोदींशी केली जातेय तुलना…

मोदींवर आणखीन एक निशाणा

यापूर्वीही पुतिन यांनी अशाप्रकारच्या प्रदीर्घ पत्रकार परिषदा घेतल्याची उदाहरणं आहेत.