रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी पायऱ्यांवरुन उतरताना खाली पडल्याची बातमी समोर येत आहे. पुतिन हे आजारी असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आता ही बातमी समोर येत असल्याने त्यांच्या प्रकृतीसंदर्भात उलटसुलट चर्चांना तोंड फुटलं आहे.
राजधानी मॉस्कोमधील शासकीय निवासस्थानी हा सारा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. शिड्यांवरुन पडल्यानंतर ७० वर्षीय पुतिन यांना लगेच तेथील सुरक्षारक्षकांनी आधार दिल्याचं ‘न्यू यॉर्क पोस्ट’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एका माजी रशियन गुप्तहेरद्वारे चालवल्या जाणार्या टेलिग्राम चॅनेल ‘जनरल एसव्हीआर’च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या अपघातानंतर पुतिन यांच्या पोटाला मार लागला. “पोट आणि आतड्यांवर परिणाम करणाऱ्या कर्करोगामुळे पुतिन यांना इनव्हॉलेन्ट्री डिफिसेट म्हणजेच ‘अनैच्छिकपणे मलमूत्र बाहेर पडण्याचा’ त्रास झाल्याचं या टेलिग्राम चॅनेलनं म्हटलं आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्या ढासळत्या प्रकृतीसंदर्भातील अफवा सध्या देशामध्ये वेगाने पसरत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या अफवांना पेव फुटण्यामागील मूळ कारण म्हणजेच रशियातील शिर्ष नेतृत्व असलेल्या पुतीन यांच्या निकटवर्तीय गर्भश्रीमंतांच्या एका गटामधील व्यक्तीने, “रक्ताच्या कर्करोगामुळे पुतिन यांना फार त्रास होत आहे,” अशी प्रतिक्रिया गुप्ततेच्या अटीखाली दिली आहे.
क्यूबाचे नेते मिगुएल डायझ-कॅनेल वाय बर्मुडेझ यांच्या भेटीदरम्यान पुतिन यांचे हात जांभळे पडले होते. त्यानंतरही त्यांची प्रकृतीबद्दल उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. या भेटीदरम्यान पुतिन अस्वस्थ दिसत होते आणि उजव्या हाताने त्यांनी खुर्ची घट्ट पकडली होती.