अमेरिका आणि रशियाच्या दोन अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात घेऊन जाणारं बूस्टर रॉकेट आकाशातच बंद पडलं. रॉकेटच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे या दोन्ही अंतराळवीरांना इमर्जन्सी लॅंडिंग करावं लागलं आणि दोन्ही अंतराळवीर थोडक्यात बचावले.दोन्ही अंतराळवीर सुखरूप असल्याची माहिती ‘नासा’ने दिली आहे. इंजिन फेल झालं त्यावेळी रॉकेटचा स्पीड 8 हजार किमी प्रतितास होता. दोन्ही अंतराळवीरांनी कझाकिस्तानच्या एका मैदानात लॅंडिंग केलं. नंतर लगेचच दोघांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विमानतळ आणि नंतर रुग्णालयात नेण्यात आलं.
सोयुज एम. एस. -१० या अंतराळ यानाला बूस्टर रॉकेट आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात घेऊन जात होतं. या बूस्टर रॉकेटमध्ये अमेरिकेचे निक हग आणि रशियाचे अॅलेक्झी ओवचीनीन हे अंतराळवीर होते. प्रक्षेपण झाल्यानंतर सोयूज अंतराळ यानाने काही अंतर योग्यपणे कापले, पण जास्त उंचीवर गेल्यानंतर त्याचं इंजिन फेल झालं आणि ते ते मध्य आकाशातच बंद पडलं. इंजिन फेल झाल्यानंतर अंतराळवीरांचं कॅप्सूल आपोआप रॉकेटपासून वेगळं झालं आणि ते सुखरूपरित्या जमिनीवर परतले. अशा प्रकारच्या अपघातांमध्ये आपोआप रॉकेटपासून वेगळे होणारे कॅप्सूल 1960 च्या दशकात बनवण्यात आले होते. दोन्ही अंतराळवीर सुखरूप असून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत असं नासाने सांगितलं.
.@AstroHague, right, and cosmonaut Alexey Ovchinin, left, embrace their families after landing in Baikonur, Kazakhstan. Hague and Ovchinin arrived after a safe landing on Earth following a Soyuz booster failure during launch earlier. Look: https://t.co/MzoA9TOqXk pic.twitter.com/mZqIiL7RYi
— NASA (@NASA) October 11, 2018
(निक हग आणि अॅलेक्झी ओवचीनीन यांचं प्रक्षेपणाआधीचं छायाचित्र)