Russia Advises TO Avoid Pakistan Tuor To Its Citizens: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने कठोर भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारताच्या कडक भूमिकेमुळे, पाकिस्तानमधील रशियन दूतावासाने एक अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. रशियन दूतावासाने जारी केलेल्या अ‍ॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, “रशियन नागरिकांनी पाकिस्तानात येणे टाळावे.”

पाकिस्तानमधील रशियन दूतावासाने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. काही अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या भडक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, परिस्थिती स्थिर होईपर्यंत रशियन नागरिकांनी तात्पुरते पाकिस्तानला भेट देण्यापासून देणे टाळावे अशी आम्ही शिफारस करतो.”

यापूर्वी, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी जारी केली होती. अमेरिकेने जारी केलेल्या ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरीत, अमेरिकन नागरिकांना भारत-पाकिस्तान सीमेपासून १० किलोमीटरच्या आत प्रवास करू नये असे सांगण्यात आले होते. बुधवारी अमेरिकन नागरिकांसाठी ही सूचना जारी करण्यात आली होती.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर अनेक कडक निर्बंध लादले आहेत. यामध्ये १९६० चा सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. त्याची अधिकृत अधिसूचना देखील गुरुवारी जारी करण्यात आली आहे. बुधवारी, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबद्दल भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली होती आणि करार निलंबित करण्यासह इतर अनेक निर्णयांची घोषणा केली होती.

पाकिस्तानला एक थेंबही पाणा जाऊ देणार नाही

पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि निष्पाप लोकांच्या क्रूर हत्येची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागत आहे. भारत सरकारने सिंधू नदी पाणी करार स्थगित केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी या प्रकरणी केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांच्याशी बैठक घेतली. दोन्ही नेत्यांमधील बैठकीत एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ देऊ नये यावर सविस्तर चर्चा झाली.

काय आहे सिंधू पाणी करार?

१९६० मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी करार झाला. या करारानुसार पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांचे पाणी हक्क मिळाले तर भारताला रावी, बियास आणि सतलज नद्यांचे पाणी हक्क मिळाले. पाकिस्तानच्या सुमारे ८०% कृषी सिंचन सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.

Live Updates