कझाखस्तानातील बैकोनूर अंतराळ केंद्रातून उड्डाण करताच रशियाचे प्रोटोन-एम वाहून नेणारे मानवरहित रॉकेट कोसळले. या बाबतचे फुटेज राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपित करण्यात आले, त्यामध्ये रॉकेटने उड्डाण करताच ते कोसळले आणि क्षणार्धात आगीचा गोळा दिसला. त्यामुळे रॉकेटमध्ये असलेले अत्यंत विषारी इंधन हवेत पसरले.या अपघातामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही, असे रशियाची अंतराळ यंत्रणा रॉस्कोमॉसने प्राथमिक अहवालात म्हटले आहे. या रॉकेटच्या उड्डाणाचे प्रक्षेपण करण्यात येत होते. काहीतरी अघटित घडत असल्याचे दूरचित्रवाणीच्या प्रतिनिधीने सांगितले. त्यानंतर क्षणार्धात रॉकेट कोसळले आणि काळा धूर आसमंतात पसरला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-07-2013 at 12:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russias carrier rocket explodes on takeoff at cosmodrome