एकीकडे रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये युद्ध सुरु असताना भारत देशाला रशियाकडून एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम वेळेवर आणि कोणताही अडथळा न येऊ देता पुरवल्या जातील असे विधान रशियन राजदूत डेनिस अलिपोव यांनी केले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील राजनैतिक संबंधाला या वर्षी ७५ वर्षे झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर रशियामधील डायजेस्ट या नियतकालीकामध्ये अलिपोव यांनी वरील भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “राहुल गांधी कायद्यापेक्षा मोठे नाहीत,” ईडी चौकशीविरोधातील काँग्रेस नेते रस्त्यावर उतरल्याने स्मृती इराणी संतापल्या

भारताने २०१८ साली एस-४०० एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्सच्या खरेदीसाठी पाच मिलियन अमेरिकी डॉलर्सचा रशियासोबत करार केला होता. या करारांतर्गत भारताला ५ एस-४०० एअर मिसाईल डिफेन्स सिस्टिम्स मिळणार होत्या. मात्र मागील काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु आहे. तसेच अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर आर्थिक तसेच विविध निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे या मिसाईल सिस्टिम्सचा भारताला पुरवठा होण्यास विलंब होऊ शकतो अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र आता रशियाचे राजदूत अलिपोव यांनी भारताला या एस-४०० एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम्सचा पुरवठा वेळेत होईल असे सांगितले आहे.

हेही वाचा >>> Corona Cases करोनाचा टक्का वाढला; सलग तिसऱ्या दिवशी देशात ८ हजारपेक्षा अधिक करोनाबाधितांची नोंद

तसेच अलिपोव यांनी डायजेस्ट या मासिकात लिहिलेल्या लेखामध्ये भारत आणि रशिया यांच्यातील आर्थिक तसेच अन्य संबंधावरही विस्तृत भाष्य केलं आहे. त्यांनी १९५०-६० या काळात भारत देशातील औद्योगिकीकरण तसेच उर्जा प्रकल्प उभारणी याचा उल्लेख केला. तसेच त्यांनी १९६० साली मुंबई येथे आयआयटीची स्थापना, १९७१ साली शांतता, मैत्री आणि सहकार्याचा करण्यात आलेला करार, १९८४ साली सोयुझ टी-११ अंतराळ यानामधून पहिल्या भारतीय अंतराळवीराचे उड्डाण, २००० साली भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या धोरणात्मक भागिदारीचा करार या सर्वांचा उल्लेख केला.

हेही वाचा >>> CCTV: जेवताना अंगावर हात टाकल्याने रोखलं, तरुणांकडून मुलींना फरफटत नेत बेदम मारहाण; चीनमधील धक्कादायक घटना

दरम्यान, रशियाने भारताल एस- ४०० एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिमचा पहिला करण्यास मागील वर्षी डिसेंबर सुरुवात केली होती. त्यानंतर मिसाईलची दुसरी तुकडी एप्रिल महिन्यात भाराताला सुपूर्द करण्यात आली होती. त्यानंतर आता रशियन राजदूत डेनिस अलिपोव यांनी यापुढेदेखील या डिफेन्स मिसाईल सिस्टिमचा भारताला नियोजित वेळेत पुरवठा होणार असल्याचे सांगितल्यामुळे लवकरच भारतीय संरक्षण क्षेत्रास आणखी बळ मिळणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: S 400 air defence missile system is proceeding well and in accordance with schedule said russian ambassador prd