नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणचे समपदस्थ हुसेन अमीर अब्दुल्लाहियन यांची बुधवारी भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. भाजपच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पश्चिम आशियातील अनेक देशांत असंतोषाचे वातावरण असताना ही भेट झाली असल्याने महत्त्वाची समजण्यात येत आहे.

जयशंकर यांनी अब्दुल्लाहियन यांच्याबरोबरच्या भेटीचे छायाचित्र ट्विटरवर प्रसारीत केले आहे. ‘नवी दिल्लीत इराणचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियन यांचे स्वागत आहे. चर्चेत निकटचे आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित होतील,’ असे या ट्विटमध्ये लिहिले आहे.

अब्दुल्लाहियन हे द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अफगाणिस्तानसह अन्य आंतराष्ट्रीय मुद्यांवर या भेटीदरम्यान चर्चा करण्याचा उद्देश आहे.

नवी दिल्लीतील बैठकीनंतर  अब्दुल्लाहियन हे मुंबई आणि हैदराबादला भेट देणार आहेत.

Story img Loader