परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी अमेरिकन समकक्ष अँटनी ब्लिंकेन यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली आणि करोना काळात भारताची साथ दिल्यामुळे जो बिडेन प्रशासनाचे आभार मानले. 20 जानेवारी रोजी बिडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेच्या अधिकृत दौर्यावर असलेले जयशंकर हे देशाचे पहिले कॅबिनेट मंत्री आहेत. “करोनाच्या सुरवातीच्या काळात भारताने अमेरिकेला केलेली मदत अमेरीका नेहमी स्मरणात ठेवील. आम्ही खात्री देतो की, या कठीण काळात आम्ही भारतासोबत उभे आहोत”, असे अँटनी ब्लिंकेन म्हणाले.
जयशंकर यांनी राज्य विभागात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “आम्ही बर्याच मुद्द्यांवर चर्चा केली. मला वाटते की गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील संबंध खूप मजबूत आहेत आणि मला विश्वास आहे की भविष्यातही असेच राहतील. कठीण काळात भारताची मदत केल्यामुळे जो बिडेन प्रशासन आणि अमेरिकेचे आभार मानतो”
Pleasure to meet @SecBlinken. A productive discussion on various aspects of our bilateral cooperation as well as regional and global issues.
Covered Indo Pacific and the Quad, Afghanistan, Myanmar, UNSC matters and other international organizations. pic.twitter.com/7UDkXsyJdC
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 28, 2021
भारत आणि अमेरिका करोनाकाळात सोबत काम करत आहे. या दरम्यान अनेक आवाहनांचा सामना आम्ही एकत्र करत असल्याचे ब्लिंकेन म्हणाले. तसेच याव्यतिरिक्त, एस जयशंकर यांनी इंडो-पॅसिफिक आणि भारत आणि अमेरिकेमधील आरोग्य, डिजिटल, ज्ञान आणि अन्य क्षेत्रांमधील भागीदारीशी संबंधित मुद्द्यांविषयी आणि अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू आणि बिडेन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत विस्तृत चर्चा केली.
एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांची घेतली भेट
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्र संघाचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस यांची भेट घेतली. यावेळी कोरोना साथीच्या आजारांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर विस्तृत चर्चा केली. बैठकीत जयशंकर यांनी जागतिक स्तरावर त्वरित व प्रभावी ‘जागतिक लस’ उपाय शोधण्याची मोठी गरज असल्याचे अधोरेखित केली. यावर्षी जानेवारीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्य म्हणून भारत सामील झाल्यानंतर जयशंकर यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रमुखांशी पहिलीचं बैठक होती.