Sabrimala Temple News : आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती मंदिरातील प्रसाद लाडूंचा वाद उफाळून आला होता. या प्रसाद लाडूंसाठी वापरण्यात येणाऱ्या शुद्ध तुपात जनावरांच्या चरबीची भेसळ करण्यात आली अशी माहिती समोर आली. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ही माहिती दिली होती. वायएसआर जगन रेड्डींच्या काळात ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला होता ज्यावरुन वाद झाला होता. या वादामुळे तीन वर्षांपूर्वी घडलेल्या शबरीमला मंदिरातील ( Sabrimala Temple ) ‘हलाल गुळा’च्या वादाची आठवण ताजी केली आहे.

काय होता तीन वर्षांपूर्वी घडलेला हलाल गुळाचा वाद?

शबरीमला मंदिर ( Sabrimala Temple ) हे भगवान अयप्पा स्वामीचं मंदिर आहे. निरनिराळ्या वादांनी ते कायमच चर्चेत राहिलं आहे. तीन वर्षांपूर्वी हिंदू संघटनांनी केरळच्या उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत हा आरोप करण्यात आला होता की या शबरीमला मंदिरात जो प्रसाद तयार करण्यात येतो त्यात हलाल गूळ वापरला जातो. ही याचिका दाखल झाल्यानंतर हा वाद चांगलाच पेटला होता. समोर आलेल्या माहितीनुसार शबरीमला ( Sabrimala Temple ) येथील अयप्पा स्वामी मंदिराच्या संचालक मंडळाने म्हणजेच त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने हलाल गूळ असं का लिहिलं जातं? हे सांगितलं होतं. कोर्टात या संचालक मंडळाने हे स्पष्टीकरण दिलं होतं की जो गुळाच्या पॅकिंगवर हलाल लिहिलं जातं कारण जी कंपनी तो गूळ तयार करते त्यांचा गूळ अरब देशांमध्येही निर्यात होतो.

शबरीमला मंदिरातील हलाल गूळ पुरवणारी कंपनी महाराष्ट्रातली

शबरीमला मंदिरातील ( Sabrimala Temple ) प्रसादात वापरण्यात येणारा हलाल गूळ हा महाराष्ट्रातल्या एका कंपनीकडून पाठवला जात होता. अरवाणा हा प्रसाद या मंदिरात तांदूळ, गूळ आणि तूप या तीन प्रमुख घटकांपासून तयार करण्यात येतो. तर उन्नीयप्पम हा पदार्थही तांदूळ, गूळ आणि इतर काही घटकांपासून तयार करण्यात येतो. हा प्रसाद तयार केल्यानंतर शबरीमला मंदिरातील ( Sabrimala Temple ) अयप्पास्वामींना दाखवण्यात येतो आणि मग भक्तांमध्ये वाटला जातो. याच प्रसादात वापरण्यात येणारा गूळ हलाल गूळ असल्याचा वाद चांगलाच पेटला होता. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे. या संदर्भात जी याचिका दाखल करण्यात आली त्यात भक्तांच्या भावनेशी चाललेला हा क्रूर खेळ आहे असाही उल्लेख करण्यात आला आहे.

हे पण वाचा- BLOG: अविचाराने माखलेला मेंदू!

याचिकेत नेमका काय उल्लेख?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेले याचिकाकर्ते एस. जे. आर कुमार यांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. अरवाणा आणि उन्नीयप्पम या दोन पदार्थांमध्ये जो गूळ वापरला जातो त्या पाकिटावर हलाल गूळ असं का लिहिलं आहे? हा लोकांच्या श्रद्धेशी चाललेला खेळ नाही का? असे प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत. जस्टिस अनिल के. नरेंद्रन आणि जस्टिस पी.जी. अजित कुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने या याचिकेवर उत्तर मागितलं होतं. ज्यावर सदर कंपनी अरब राष्ट्रांमध्ये गूळ निर्यात करते म्हणून तसा उल्लेख आहे असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. मात्र तिरुमला तिरुपती मंदिराच्या प्रसाद लाडूंच्या आधी हा वाद चांगलाच पेटला होता.