Sabarmati Express Derails Near Kanpur Ashwini Vaishnaw Remark : उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात मोठा रेल्वे अपघात झाला आहे. वाराणसी-अहमदाबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे कानपूर व भीमसेन स्थानकादरम्यान घसरले. रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कुठल्याही प्रवाशाला मोठी इजा झालेली नाही, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. लोको पायलटने दिलेल्या माहितीनुसार कोणीतरी रूळावर दगड व काही जड वस्तू ठेवल्या होत्या ज्यामुळे हा अपघात झाला. या अपघातानंतर रेल्वेने प्रवाशांना बसची सुविधा उपलब्ध करून देत कानपूरपर्यंत पोहोचवलं. त्यांना तिथून अहमदाबादला जाणाऱ्या दुसऱ्या रेल्वेची व्यवस्था करून दिली.

साबरमती एक्सप्रेसचे २२ डबे रुळावरून खाली घसरले आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचं समोर आलेलं नाही. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, साबरमती एक्सप्रेसच्या अपघातामुळे या मार्गावरील सात मेल व एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर तीन रेल्वेगाड्या इतर मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. अहमदाबादला जाणारी साबरमती एक्सप्रेस रात्री कानपूर स्थानकावरून निघाल्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे २.३० वाजता भीमसेन स्थानकाच्या अलीकडे रूळावरून खाली घसरली. या घटनेच्या एक तास आधी रात्री १.२० वाजता पाटणा-इंदूर रेल्वे कोणत्याही अडथळ्याशिवाय याच मार्गावरून निघून गेली होती. रात्री दीड ते अडीचच्या सुमारास कोणीतरी रुळावर मोठे दगड ठेवल्याने रेल्वेगाडी रुळावरून घसरल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या दगडांमुळे वर रेल्वे रुळावरून खाली उतरली. या अपघातामुळे इंजिनाच्या बऱ्याचशा भागाचं नुकसान झालं आहे.

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
biker dies due to speeding bike falls from bridge
भरधाव वेगाने जाणारी दुचाकी पुलावरून कोसळली, दुचाकीस्वाराचा मृत्यू
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा

हे ही वाचा >> Kolkata Doctor Murder : “कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणात रुग्णालयातील डॉक्टर व इंटर्नही सहभागी”, पीडितेच्या आई-वडिलांनी CBI ला काय सांगितलं?

साबरमती एक्सप्रेस कशामुळे घसरली?

दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघाताची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी अपघाताचं कारणही सांगितलं आहे. वैष्णव यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, साबरमती एक्सप्रेसचं (वाराणसीवरून अहमदाबादला जाणारी रेल्वे) इंजिन सकाळी २.३५ वाजता कानपूरजवळ रुळावरून घसरलं. रेल्वे रुळावर ठेवलेल्या काही वस्तूंना इंजिन धडकलं व इजिनसह रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले. आयबी (इंटेलिजेन्स ब्युरो) व उत्तर प्रदेश पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

रेल्वेमंत्री म्हणाले, या अपघातात प्रवासी अधवा रेल्वे कर्मचाऱ्यांना इजा झालेली नाही. सर्वजण सुरक्षित आहेत. प्रवाशांना अहमदाबादला जाण्यासाठी बस (कानपूर स्थानकापर्यंत) व रेल्वेची व्यवस्था करून देण्यात आली आहे.