मध्यप्रदेशात ३ दिवस करणार काँग्रेससाठी प्रचार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानानंतर आता प्रचारसभा गाजवण्यास उतरणार आहे. मध्य प्रदेशमध्ये होणा-या आगामी निवडणुकीसाठी सचिन प्रचार करणार असल्याची माहिती मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते प्रमोद गुगलिया यांनी दिली आहे. मुंबईत कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर सचिन मध्यप्रदेशमध्ये तीन दिवस काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे वृत्त आहे.
मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, या ठिकाणी जोरदार प्रचार सुरु आहे. स्टार प्रचारक म्हणून काँग्रेसकडून सचिनला मैदानात उतरविण्यात येणार आहे.

Story img Loader