हिंदुत्त्ववादी नेत्या साध्वी प्राची यांनी मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांचे मुंडके उडवणाऱ्याला ५० लाखांचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे. उत्तराखंडमधील रुकडी येथे एका पत्रकराशी बोलताना त्यांनी हे जाहीर केले.
‘झाकीर नाईक हे इस्लामचे प्रचारक नसून ते दहशतवादी आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. म्हणूनच त्यांचे मुंडके उडवायला हवे आणि हे काम करणा-याला मी ५० लाखांचे बक्षिस देण्याचे ठरवले आहे, असे स्पष्टीकरणही साध्वी प्राची यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिले आहे.
तसेच, हे बक्षिस मी स्वत:हून जाहीर करते आहे, विश्व हिंदू परिषदेचा याच्याशी काहीही संबध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. साध्वी प्राची विश्व हिंदू परिषदेच्या माजी नेत्या होत्या. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे साध्वी प्राची देखील अनेकदा चर्चेत आल्यात. आता त्यांनी आपला मोर्चा थेट झाकीर नाईक यांच्याकडे वळवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून झाकीर नाईक हे देखील वादाच्या भोवऱ्यात आहेत. आपल्या प्रक्षोभक भाषणांमुळे झाकीर नाईक भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर आहेत. साध्वी प्राची यांनी उघडपणे झाकीर नाईक यांची हत्या करावी, असे आवाहन केले आहे खरे पण या आवाहनामुळे त्या पुन्हा एकदा नव्या वादात अडकल्या जाऊ शकतात.
संग्रहित लेख, दिनांक 14th Jul 2016 रोजी प्रकाशित
झाकीर नाईकची हत्या करणाऱ्या ५० लाखांचे बक्षिस, साध्वी प्राची यांचे प्रक्षोभक आवाहन
साध्वी प्राची यांनी मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांचे मुंडके उडवणाऱ्याला ५० लाखांचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे.
Written by एक्सप्रेस वृत्तसेवा

First published on: 14-07-2016 at 11:33 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadhvi prachi announced a reward of rs 50 lakh for zakir naiks death