गेल्या काही दिवसांपासून देशातलं राजकीय वातावरण हिजाब प्रकरणावरून तापू लागलं आहे. कर्नाटकमधून सुरू झालेल्या या प्रकरणाचे पडसाद देशाच्या इतरही काही भागांमध्ये उमटू लागले आहेत. इतकंच काय, काही केंद्रीय नेते देखील यासंदर्भात विधानं करू लागले आहेत. यामध्ये आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा देखील समावेश झाला असून त्यांनी नुकत्याच केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या भाजपा खासदार असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भारतात हिजाब घालण्याची गरजच नाही, असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हिंदू महिला सुरक्षित”

एबीपी लाईव्हनं दिलेल्या वृत्तानुसार, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हिजाब प्रकरणावर केलेल्या विधानावरून वाद सुरू झाला आहे. “हिंदू सनातनी परंपरा मानतात. हिंदू धर्मात महिलेला देवीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे हिंदू महिला सुरक्षित असतात”, असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच, शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालून आलेलं चालणार नाही, असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

Hijab Row : “वर्गात बसायचं असेल तर हिजाब काढा”, कर्नाटकमध्ये शाळा पुन्हा उघडताच व्यवस्थापनाचे आदेश!

“मुस्लीम महिलांनी मदरशांमध्ये हिजाब घालून जावं. पण शाळा-कॉलेजांमधअये हिजाब घालून जाणं चालणार नाही. मुस्लीम महिलांना त्यांच्या घरातच हिजाब घालायला हवा, कारण त्यांना त्यांच्या घरातच त्रास होत असतो”, असं त्या म्हणाल्या आहेत.

हिजाब आणि खिजाबची तुलना!

यावेळी बोलताना प्रज्ञा ठाकूर यांनी हिजाब आणि खिजाबची तुलना केली आहे. “खिजाबचा उपयोग वय लपवण्यासाठी केला जातो, तर हिजाबचा उपयोग चेहरा लपवण्यासाठी केला जातो. मुस्लिम महिलांना त्यांचे काका, मामा, मामाच्या मुलांकडून धोका असतो. त्याामुळे त्यांनी घरातच हिजाब घालायला हवा”, असं प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या आहेत.

लोकसत्ता विश्लेषण: हिजाब आणि बुरख्यात फरक काय? जाणून घ्या मुस्लीम महिलांच्या पोशाखांविषयी

हिंदूही गुरुकुलमघ्ये भगवे वस्त्र घालतात, पण…

“हिंदू विद्यार्थी देखील गुरुकुलमध्ये भगवी वस्त्र घालून जातात. पण शाळा-कॉलेजांमध्ये ते गणवेशच घालतात. मुस्लिमांनी देखील मदरशांमध्ये काहीही घालावं, लोकांना त्यानं काही फरक पडत नाही, पण शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालण्याची काही गरज नाही”, असं त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadhvi pragya singh thakur controversial statement on hijab row in karnataka pmw