करोना रुग्णांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने तयार केलेले आरोग्यसेतू उपयोजन हे व्यक्तिगततेचा भंग करणारे असल्याचा विरोधकांचा आरोप माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेटाळला असून हे उपयोजन सुरक्षित व उपयोगी असल्याचे म्हटले आहे. या उपयोजनात लोकांची व्यक्तिगत माहिती सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रसाद यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, नीती आयोग व काही खासगी संस्था यांनी एकत्र येऊन हे उपयोजन (अ‍ॅप) तयार केले आहे. करोना विरोधातील लढय़ात ते मोठी भूमिका पार पाडत आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी असा आरोप केला होता की, आरोग्यसेतू उपयोजन हे नागरिकांवर टेहळणी करण्यासाठीची आधुनिक प्रणाली आहे. यातील माहिती खासगी संस्था गोळा करतात व त्यावर कुणाचीही देखरेख नाही. यातील लोकांची व्यक्तिगत माहिती सुरक्षित नाही. तंत्रज्ञान लोकांना सुरक्षित ठेवू शकते हे मान्य केले तरी त्यातून लोकांची माहिती त्यांच्या परवानगीविना गोळा केली जात आहे .

राहुल यांच्या आरोपाला उत्तर देताना प्रसाद यांनी सांगितले की, हे उपयोजन सुरक्षित असून त्यातील माहिती संकेतावलीबद्ध आहे. तुमच्या परिसरात जर करोना रुग्ण असेल तर त्याची माहिती हे उपयोजन डाऊनलोड केलेल्या व्यक्तीस मिळते व ती सावध होते. यातून एखाद्या करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती मिळू शकते. इतर देशातही अशाच उपयोजनांचा वापर चालू असून आरोग्यसेतूमधील माहिती मर्यादित आहे ती ३० दिवस राहते जर तुम्हाला संसर्ग झाला असेल तर ४५ ते ६० दिवस राहते नंतर आपोआप नष्ट होते. हे उपयोजन तुम्ही मोबाइलवर डाऊनलोड करू शकता तसेच काढूनही टाकू शकता. मग त्याबाबत एवढा गदारोळ करण्याचे कारण काय.

फिचर फोनसाठी आम्ही आरोग्यसेतू आयव्हीआरएस हे उपयोजन तयार केले आहे त्यातही व्यक्तिगत माहिती सुरक्षित राहते.

आरोग्यसेतू उपयोजन हा करोनाला रोखण्यासाठीचा तंत्रज्ञान आविष्कार असून त्यातून सभोवताली करोनाबाधित आहे की नाही हे तर समजतेच पण महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक समजतात.

९ कोटी लोकांकडून वापर

केंद्र सरकारने कोविड १९ साथीचा मुकाबला करण्यासाठी तयार केलेले आरोग्य सेतू उपयोजन ९ कोटी लोकांनी डाऊनलोड केले असून सरकारी-खासगी कर्मचाऱ्यांना त्याचा वापर बंधनकारक आहे.

कोविड १९ बाबत नेमण्यात आलेल्या मंत्रिगटाला या उपयोजनाची माहिती मंगळवारी अधिकाऱ्यांनी दिली. मंत्रिगटाची चौदावी बैठक झाली, त्यात आरोग्यसेतू उपयोजनाचा वापर, प्रभाव व फायदे याचा विचार करण्यात आला. नैतिक हॅकर्सनी या उपयोजनाच्या सुरक्षा मुद्दय़ांवर शंका उपस्थित केल्या होत्या, तसेच काँग्रेसनेही त्यावर टीका केली होती.

आता परदेशातून ज्या लोकांना भारतात आणले जाणार आहे, त्या लोकांना या उपयोजनावर जाऊन नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. ज्या लोकांकडे लँडलाइन फोन किंवा फीचर फोन आहे त्यांनाही आता इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स प्रणालीच्या माध्यमातून या उपयोजनाचा लाभ घेता येणार आहे. त्यात स्थानिक भाषांचा वापरही करता येईल. कोविड १९ प्रतिबंधात्मक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना हे उपयोजना डाऊनलोड करणे सक्तीचे करण्यात येणार आहे. मंगळवारी फ्रेंच  हॅकर इलियट अल्डरसन यांनी असा दावा केला होता, की आरोग्य सेवा उपयोजनातील माहिती सुरक्षित नाही. त्यामुळे भारतातील ९ कोटी लोकांची व्यक्तिगतता धोक्यात आहे.

आयव्हीआरएस अ‍ॅप

फीचर फोनसाठी सरकारने आरोग्य सेतू इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टीम हे नवे उपयोजन तयार केले आहे. आयव्हीआरएस अ‍ॅप हे टोल फ्री सेवा असून देशभरात उपलब्ध आहे. त्यासाठी १९२१ या क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे, त्यानंतर  उलट फोन येईल व आरोग्याबाबत माहिती विचारली जाईल.