सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात नव्याने दाखल केलेली घरबंदीची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.
सुब्रतो रॉय सुटकेसाठी विदेशातील हॉटेल्स मालमत्ता विक्रीस न्यायालयाची परवानगी
स्वत:च्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात यावे आणि आधीच्या निकालात सुधारणा करण्यात यावी या आशयाची याचिका रॉय यांच्या वकीलाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे रॉय यांचा मुक्काम कारागृहातच राहणार आहे. दरम्यान, आवश्यक तो निधी उभारण्यासाठी विदेशातील हॉटेलांची विक्री करण्यास न्यायालयाने सहारा समूहास अनुमती दिली आहे. यामध्ये पुढील सुधारणा करत न्यायालयाने रॉय यांना कायमस्वरूपी ठेव (फिक्‍स डिपॉझिट) व इतर ठेवींचे रोकड स्वरुपात रुपांतर करण्यास परवानगी दिली आहे आणि ही सर्व रक्कम सेबीच्या देखरेखीखाली बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा