सहारा समुहाने आज(गुरूवार) सर्वोच्च न्यायालयात सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयासोर नवा प्रस्ताव दाखल केला. यावेळीही रॉय यांच्या सुटकेसाठी दहा हजार कोटी भरण्यास असमर्थ असल्याचे सहाराचे म्हणणे आहे.
सहाराच्या नव्या प्रस्तावानुसार, सध्या २,५०० कोटी रुपये भरण्यास तयार असून रॉय यांच्या सुटकेनंतर पुन्हा २१ दिवसांत २,५०० कोटी रुपये भरण्यास तयारी असल्याची विनंती सहारासमुहाने सर्वोच्च न्यायालयासमोर केली.
रॉय यांच्या सुटकेसाठी दहा हजार कोटी भरण्यासाठी असमर्थ असल्याचे सहाराकडून स्पष्ट करण्यात आल्याने सुब्रतो रॉय यांचा दिल्लीतील तिहार कारागृहातील मुक्काम वाढला होता. यावेळी सहाराकडून नव्याने याचिका दाखल करण्यात आलेली असली, तरी अजूनही दहा हजार कोटी एकरकमी भरणे अशक्य असल्याचे सहारा समुहाचे म्हणणे आहे.
सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी सहाराकडून सर्वोच्च न्यायालयासमोर नवा प्रस्ताव
सहारा समुहाने आज(गुरूवार) सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुब्रतो रॉय यांच्या जामिनासाठी नव्याने याचिका दाखल केली आहे. यावेळीही रॉय यांच्या सुटकेसाठी दहा हजार कोटी भरण्यास असमर्थ असल्याचे सहाराचे म्हणणे आहे.
First published on: 03-04-2014 at 12:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahara makes fresh proposal in sc for subrata roys release tells court it cant pay rs 10k crore