सहारा समुहाने आज(गुरूवार) सर्वोच्च न्यायालयात सुब्रतो रॉय यांच्या सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयासोर नवा प्रस्ताव दाखल केला. यावेळीही रॉय यांच्या सुटकेसाठी दहा हजार कोटी भरण्यास असमर्थ असल्याचे सहाराचे म्हणणे आहे.
सहाराच्या नव्या प्रस्तावानुसार, सध्या  २,५०० कोटी रुपये भरण्यास तयार असून रॉय यांच्या सुटकेनंतर पुन्हा २१ दिवसांत २,५०० कोटी रुपये भरण्यास तयारी असल्याची विनंती सहारासमुहाने सर्वोच्च न्यायालयासमोर केली.
रॉय यांच्या सुटकेसाठी दहा हजार कोटी भरण्यासाठी असमर्थ असल्याचे सहाराकडून स्पष्ट करण्यात आल्याने सुब्रतो रॉय यांचा दिल्लीतील तिहार कारागृहातील मुक्काम वाढला होता. यावेळी सहाराकडून नव्याने याचिका दाखल करण्यात आलेली असली, तरी अजूनही दहा हजार कोटी एकरकमी भरणे अशक्य असल्याचे सहारा समुहाचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा