घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, करोनाचा धोका कायम असल्याने संबंधित सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन होणं अत्यंत आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर, आज (५ ऑक्टोबर) शिर्डी साई संस्थानाने नवी नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार, येत्या ७ ऑक्टोबरपासून शिर्डीचं साईमंदिर देखील भाविकांसाठी खुलं होणार आहे. मात्र, काही नियम यावेळी लागू असतील. शिर्डी साई संस्थानाच्या नियमावलीनुसार, दररोज १५ हजार भाविकांनाच दर्शन घेता येणार आहे. त्याचसोबत, दर्शनासाठी जाताना आता भाविकांना हार-प्रसाद घेऊन जाता येणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

साई संस्थानाने आज पत्रकार परिषद घेऊन ही नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार, दररोज १५ हजार भाविकांना साईमंदिरात प्रवेश मिळणार आहे. म्हणजे दर तासाला जवळपास ११५० भाविक दर्शन घेतील. त्याचप्रमाणे, मंदिरातील काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत सर्व आरतींसाठी फक्त ९० साईभक्तांना परवानगी असेल. त्यात १० गावकऱ्यांचा आणि अन्य ८० भाविकांचा समावेश असेल. मुख्य म्हणजे १० वर्षांखालील मुलांना, ६५ वर्षांवरील नागरिकांना आणि गरोदर महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई असेल.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
cultural and educational rights under indian constitution article 29 and 30
संविधानभान : भाषेचा मायाळू विसावा
two kerala ias officers suspended over hindu muslim whatsapp group
अन्वयार्थ : ‘कर्त्यां’चा बेभानपणा!
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
AMU minority status upheld 1967 decision quashed by Supreme Court
‘एएमयू’चा अल्पसंख्याक दर्जा कायम, १९६७ चा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; नियमित खंडपीठात सुनावणी
Canada News
Canada : चिथावणीखोर वक्तव्याबद्दल कॅनडातील ब्रॅम्प्टनमधील हिंदू मंदिराच्या पुजाऱ्याची हकालपट्टी

शिर्डी साई संस्थानाची नियमावली

  • दररोज फक्त १५ हजार भाविकांनाच दर्शन
  • हार-प्रसाद घेऊन जाता येणार नाही
  • १० वर्षांखालील मुलांना, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि गरोदर महिलांना प्रवेश नाही
  • आरतीसाठी फक्त १० गावकऱ्यांना प्रवेश

पत्रकार परिषदेत शिर्डी साई संस्थानाने दिलेल्या माहितीनुसार, संस्थानाचं भक्तनिवास आणि प्रसादालय देखील भाविकांसाठी सुरु होणार आहे.