Saif Ali Khan Attacker : अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाला होता. त्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात तब्बल पाच दिवस उपचार सुरू होते. उपचारानंतर परवा सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. दरम्यान सैफवर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील घरी चाकूने हल्ला केल्यानंतर आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामने ३८ तासांनी, त्याच्या वडिलांना बांगलादेशातील झलोकाठी येथील घरी फोन केला होता. शरीफुलने त्याच्या वडिलांना सांगितले की, त्याने त्यांच्या खात्यात १०,००० टका (बांगलादेशी रुपये) ट्रान्सफर केले आहेत. शरीफुलने यावेळी त्याचा वडिलांना सांगितले की, त्याच्याकडे पुढील काही दिवसांसाठी ३,००० रुपये आहेत.

हल्लेखोराचे वडील काय म्हणाले?

सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर दोन दिवसांनंतर, हल्लेखोराच्या वडिलांनी त्यांच्या मुलाबाबतचे वृत्त टीव्ही आणि सोशल मीडियावर पाहिले. हल्लेखोराचे वडील बांगलादेशात एका जूट कंपनीत क्लर्क म्हणून काम करतात. त्यांचे नाव रुहुल असे आहे. यावेळी ते म्हणाले की, “हा प्रकार पाहूण मला आश्चर्य वाटले. आम्हाला कोणतीही आर्थिक समस्या नाही आणि आमचा मुलगा असा गुन्हा करेल अशी कल्पनाही आम्ही कधी केली नव्हती.” आरोपीचे वडील मोहम्मद रुहुल अमीन फकीर यांनी फोनवरून इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

३० वर्षीय शरीफुलने दहावीनंतर शाळा सोडली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चांगल्या नोकरीच्या शोधात बांगलादेशातील एका एजंटमार्फत तो बेकायदेशीरपणे भारतात आला, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

“येथील वाढत्या राजकीय अस्थिरतेमुळे, त्याला येथे भविष्य नाही असे वाटायचे. म्हणून तो एका मध्यस्थांच्या मदतीने कोणत्याही कायदेशीर कागदपत्रांशिवाय भारतात गेला”, असे त्याचे वडील म्हणाले.

शरीफुलने मुंबईत येण्यापूर्वी सुमारे एक महिना पश्चिम बंगालमधील एका हॉटेलमध्ये काम केले, असा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे. भारतात आल्यानंतर सैफवर हल्ला करणारा आरोपी त्याचे आई-वडील, पत्नी आणि दोन भावांबरोबर नियमित संपर्कात असायचा.

ठाण्यातून अटक

१६ जानेवारी रोजी पहाटे शरीफुलने सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. अखेर रविवारी त्याला ठाण्यातून अटक करण्यात आली. त्याच्यावर दरोडा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरीफुलने केलेल्या चाकू हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. आरोपीने सैफच्या पाठीवर चाकूने वार केले होते. चाकूचे एक टोक सैफच्या पाठीत घुसले होते. लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून सैफच्या पाठीतून चाकूचा तुकडा काढला होता.

आरोपी शरीफुल मागील सात महिन्यांपासून भारतात राहत होता. तो कागदपत्रांची गरज भासणार नाही, अशा नोकऱ्या करत होता. त्याला रविवारी अटक केल्यानंतर मुंबईतील न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दुसरीकडे, हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Live Updates