डिसेंबरमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अधिकाधिक तरुणांनी मतदान करावे, यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी दिल्लीत एक बाइक रॅली काढण्यात येणार आह़े  या रॅलीत चित्रपट अभिनेता सैफअली खानही सहभागी होणार आह़े सैफ त्याचा नवा चित्रपट ‘बुलेट राजा’च्या प्रमोशनसाठी सध्या अनेक प्रयत्न करीत आह़े  याचाच एक भाग म्हणून सैफ त्याची सहअभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलीया हेही याच्यासोबत या रॅलीत सहभागी होणार आहेत़  २७ नोव्हेंबर रोजी १२ ते ४ या वेळेत ही रॅली होणार असून याची सुरुवात जिल्हा न्यायदंडाधिकारी (उत्तर) कार्यालयापासून होणार आह़े  रॅलीत वाटेत ५ ते ६ ठिकाणी थांबवून लोकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आह़े

Story img Loader