भाजपाचे फायर ब्रँड नेते आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्याचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये ते दिल्लीतील जामा मशिद उद्ध्वस्त करण्याबाबत बोलताना दिसत आहेत. गुरुवारी (दि. २२) झालेल्या एका जाहीर कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे.
#WATCH: BJP MP Sakshi Maharaj says in Unnao "Rajneeti mein jab aaya to pehla mera statement tha Mathura mein, Ayodhya Mathura Kashi ko chhodo Dilli ki Jama Masjid todo, agar seedhion mein murtiyaan na nikle to mujhe faansi pe latka dena." (22.11.2018) pic.twitter.com/9pywDQ2flB
— ANI UP (@ANINewsUP) November 24, 2018
साक्षी महाराज म्हणतात, जेव्हा मी राजकारणात आलो होतो तेव्हा माझी पहिली घोषणा होती की, अयोध्या-मथुरा-काशी सोडा, दिल्लीची जामा मशिद तोडा. ही मशीद तोडल्यानंतर इथं हिंदू देवतांच्या मुर्त्या सापडल्या नाहीत तर मला फाशीवर लटकवा. या विधानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
नुकतेच या जाहीर कार्यक्रमात साक्षी महाराजांनी आजच्या पिढीच्या कथावाचकांवर टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, देशात असे कथावाचक आहेत ज्यांना श्रीमद भागवत कथेतील क, ख, ग ही माहिती नाही. स्वतःचे उदाहरण देऊन त्यांनी आजच्या कथावाचकांना त्यांनी सल्लाही दिला होता. राजकारणात येण्यापूर्वी आपण कथाकथन आणि प्रवचने देण्याचे काम करीत होतो.