काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान, सैफअली खान तसेच अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यावर आज(शनिवार) जोधपूर न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. यासर्व कलाकारांवर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास यांना सहा वर्षाची शिक्षा होऊ शकते. सलमान खानला वैद्यकीय कारणामुळे न्यायालयात अनुपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे सलमान खान न्यायालयात गैरहजर होता. तर सैफअली खान आणि सदर आरोप लावण्यात आलेले इतर कलाकार न्यायालयात उपस्थित होते. सलमान खान उपचारासाठी अमेरिकेला गेल्या असल्याचे त्याच्या वकिलाने सांगितले. सलमान खानवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार काळवीट शिकार केल्यामुळे आरोप निश्चित करण्यात आले. तर इतर चार कलाकारांवर सलमानला शिकार करण्यासाठी उत्तेजीत केल्याचे आरोप न्यायालयाने निश्चित केले आहेत. २ ऑक्टोबर १९९८ रोजी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान, जोधपूर येथे सलमान खानने एका काळवीटाची शिकार केली होती.  सदर खटल्याची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होणार आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा