काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी आज राजकीय रणनीतीकार प्रशात किशोर यांना प्रत्युत्तर दिले आहे. विरोधी नेतृत्व “लोकशाही पद्धतीने” ठरवले पाहिजे, असं प्रशांत किशोर म्हणाले होते.
यावर सलमान खुर्शीद यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे की, ” पीकेची लोकाशाहीबद्दल उत्सुकता आहे. ते काँग्रेस कार्यकर्त्यांच्या लोकशाहीबद्दलच्या निवडीवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी देवत्वाचा वापर करतात. हे आपल्याला सांगते की, हे आपल्याला सांगते की राजकारणाविषयीच्या पुस्तकी ज्ञानाचा मानवी आचरणावर परिणाम होत नाही. राजकारण म्हणजे केवळ निवडणुका जिंकणे नाही. ”
तसेच, “प्रशांत किशोरसाठी धडा : देवत्व विश्वासाबद्दल आहे. लोकशाही विश्वासाबद्दल आहे. अन्य लोक लोकाशाही निवडीसाठी स्क्रीप्ट नाही लिहू शकत. जर लोकशाही निवड समजत नसेल, तर शाळेत परत जा आणि नव्याने सुरूवात करा. कदाचित आस्था आणि श्रद्धेत फरक केल्याने भाजपाला उत्तर मिळेल. ” असं देखील खुर्शीद म्हणाले आहेत.
या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना प्रशांत किशोर यांनी, काँग्रेस नेतृत्व हा एखाद्या व्यक्तीचा दैवी अधिकार नाही, असं म्हटलं होतं.
यासंदर्भात प्रशांत किशोर यांनी ट्विट करत म्हटले होते की, ” काँग्रेस मजबूत विरोधी पक्षासाठी ज्या विचार आणि विस्ताराचे प्रतिनिधित्व करते, ते महत्वपूर्ण आहे. परंतु काँग्रेस नेतृत्व हा एखाद्या व्यक्तीचा दैवी अधिकार नाही. मुख्यत्वे अशा परिस्थितीत जेव्हा पक्ष मागील दहा वर्षांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त निवडणुका हरलेला आहे. म्हणूनच विरोधी पक्षाचे नेतृत्व लोकशाही पद्धतीने ठरवू द्या. ”