काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. राम मंदिरात होणारी प्राणप्रतिष्ठा आणि उद्घाटनाची तयारी यामुळे धर्माला जास्त महत्त्व दिलं आहे असं म्हणत त्यांनी या सगळ्या गोष्टींबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसंच भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. सगळ्या देशात राम मंदिराचा ट्रेंड आहे, जो माझ्यासाठी त्रासदायक आहे असंही सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी हे जास्तीत जास्त वेळ मंदिरांमध्ये घालवत आहेत

इंडियन ओव्हरसीजचे चेअरमन सॅम पित्रोदा यांनी असंही म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा जास्तीत जास्त वेळ मंदिरांमध्ये घालवत आहेत. याच गोष्टीची मला चिंता वाटते. मला वाटतं त्यांनी शाळांमध्ये वेळ घालवला पाहिजे, विज्ञान केंद्रांमध्ये गेलं पाहिजे तसंच वारंवार मंदिरांमध्यल्या फेऱ्या थांबवल्या पाहिजेत. देशात धर्माला जास्त महत्त्व दिलं जातं आहे. मात्र काय महत्त्वाचं आहे? राम मंदिर की बेरोजगारी? असा प्रश्नही सॅम पित्रोदा यांनी विचारला आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
ravi rana resign
अमरावती : नवनीत राणा म्‍हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”

धर्माला अजेंडा म्हणून वापरणं गैर आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीची मूल्ये कमी करत आहेत. १० वर्षे ते पंतप्रधान आहेत मात्र त्यांनी अद्याप पर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. मला या गोष्टीची चिंता वाटते आहे. तसंच आपला देश चुकीच्या दिशेने चालला आहे किंवा भरकटतो आहे असंच मी म्हणेन. धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. धर्माला राष्ट्रीय अजेंडा म्हणून वापरणं चुकीचं आहे. देशाचा अजेंडा हा शिक्षण, रोजगार, विकास, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्यसेवा, पर्यावरण आणि प्रदूषण निर्मूलन हा असला पाहिजे. याच मूल्यांच्या आधारे तुम्ही एका आधुनिक राष्ट्राची निर्मिती करु शकता. मला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही की तुम्ही कुठला धर्म मानता? असंही सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे.

भारतात जी दूरसंचार क्रांती झाली त्याची सुरुवात करण्याचं श्रेय सॅम पित्रोदा यांना जातं. त्यांनी हे म्हटलं आहे की कोण कुठला धर्म मानतो? यासाठी मी कुणाचा आदर करत नाही, तो प्रश्न व्यक्ती सापेक्ष आहे. त्याचप्रमाणे कोण काय खातं? कोण कसे कपडे परिधान करतं यालाही महत्त्व नाही, कोण कुणाची पूजा करतं हा देखील व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मात्र संपूर्ण देश जर राम मंदिराच्या पूजेत आणि रामजन्मभूमीचा उदो उदो करण्यात अडकत असेल तर ही चिंतेची बाब आहे. धर्म ही प्रत्येकाची खासगी बाब आहे, त्याचं राष्ट्रीयकरण करु नका असंही सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे.

Story img Loader