IIT Ranchi: ओव्हरसिस काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी सॅम पित्रोदा यांनी २२ फेब्रुवारी रोजी दावा केला होता की, “आयआयटी रांचीच्या शेकडो विद्यार्थ्यांना लेक्चर देत असताना, कोणीतरी त्यांचे एक्सवरील वेबकास्ट हॅक करून तो विस्कळीत केला आणि तिथे अश्लील व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली.” दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने पित्रोदा यांचे हे दावे चुकीचे असल्याचे म्हणत, या दावांना कोणताही आधार नसल्याचेही म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या सॅम पित्रोदा यांनी केलेल्या दाव्यावर शिक्षण मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आयआयटी रांचीच्या विद्यार्थ्यांशी डिजिटल संवाद साधताना कोणीतरी त्यांचे वेबकास्ट हॅक करून आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित केले होते, असा पित्रोदा यांचा दावा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पूर्णपणे नाकारले आहे. सरकारने पित्रोदा यांच्या दाव्यांची तथ्य पडताळणी केल्यानंतर ते खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर रांचीमध्ये आयआयटी नावाची कोणतीही संस्था नाही, मग तिथे भाषण देण्याची चर्चा कुठून आली? असा सवालही शिक्षण मंत्रालयाने केला आहे.

दावे-प्रतिदावे

सॅम पित्रोदा यांनी २२ फेब्रुवारी रोजी दावा केला होता की, ते आयआयटी रांचीच्या शेकडो विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना, कोणीतरी त्यांचे वेबकास्ट हॅक करून तो विस्कळीत केला आणि तिथे अश्लील व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. शिक्षण मंत्रालयाने पित्रोदा यांचे हे विधान चुकीचेच नाही तर अज्ञानाने भरलेले आणि कोणत्याही आधाराशिवाय असल्याचेही म्हटले आहे.

पुढे शिक्षण मंत्रालयाने हेही स्पष्ट केले की रांचीमध्ये आयआयटी नाही तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, IIIT रांचीने देखील पुष्टी केली आहे की, सॅम पित्रोदा यांना कोणत्याही चर्चासत्र किंवा कार्यक्रमात आमंत्रित केले गेले नव्हते.

संपूर्ण वादावर शिक्षण मंत्रालय नाराज

शिक्षण मंत्रालयाने या संपूर्ण वादावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, “अशी बेजबाबदार विधाने देशातील प्रतिष्ठित संस्थांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे. जर कोणी संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.” दरम्यान, शिक्षण मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतर सॅम पित्रोदा यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.