उत्तर प्रदेशातील मुजारिया परिसरात एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात सत्तारूढ सपाचे आमदार हाजी इरफान आणि त्यांचे दोन सहकारी ठार झाले.
उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातील मंत्री शिवपालसिंह यादव यांच्या पुत्राच्या विवाह समारंभाला उपस्थित राहून परतत असताना बिलारीचे आमदार हाजी इरफान आणि त्यांचे दोन सहकारी अपघातात ठार झाले. या अपघातात अन्य पाच जण जखमी झाले आहेत. इरफान यांना बरेली येथे उपचारासाठी नेण्यात येत होते, त्यांचे सहकारी के. पी. सिंह आणि चालक फरझाद अली हे जागीच ठार झाले.

Story img Loader