Sambhal Jama Masjid: उत्तर प्रदेशातील योगी आदित्यानाथ यांच्या सरकारने रंगपंचमी निमित्ताने काही मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यात रंगपंचमीच्या दिवशी मशिदी ताडपत्रीने झाकण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. आता संभलमधील मुस्लिम समुदायाने रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गात येणाऱ्या सुमारे १० मशिदींना ताडपत्रीने झाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलिसांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

संभलचे वरिष्ठ पोलीस आयुक्त म्हणाले की, धार्मिक स्थळांचे संरक्षण परस्पर संमतीने केले जाईल. हिंदू समुदायाने दुपारी २.३० वाजेपर्यंत रंगपंचमी खेळावी. त्यानंतर मुस्लिम लोक नमाज पठण करतील. दरम्यान रंगपंचमीच्या दिवशी काढल्या जाणाऱ्या चौपैय्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या मिरवणुकीच्या मार्गावर येणाऱ्या सर्व मशिदी ताडपत्रींनी झाकण्यात येणार आहेत.

संभलची जामा मशिदही झाकली जाणार

ताडपत्रींनी झाकण्यात येणाऱ्या या मशिदींमध्ये शाही जामा मशीदीचा देखील समावेश आहे. आज अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला संभल येथील जामा मशिदीचे रंगकाम एका आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर, न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला मशिदीच्या बाहेरील भिंती रंगवण्याचे आणि तेथे दिवे बसवण्याचे निर्देश दिले.

शाहजहांपूरमधील ६७ मशिदी ताडपत्रीने झाकल्या

शाहजहांपूरमध्ये होळीच्या दिवशी लाट साहेबांची मिरवणूक काढली जाते आणि त्यासाठी शहरातील सुमारे ६७ मशिदी आणि दर्ग्यांना ताडपत्रीने झाकण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक म्हणाले की, शहरातून निघणाऱ्या पारंपारिक लाट साहेब मिरवणुकीच्या १० किमी मार्गात असलेल्या सर्व मशिदी आणि दर्ग्यांवर रंग पडू नयेत म्हणून त्यांना काळ्या फॉइल आणि ताडपत्रीने झाकण्यात आले आहे.

काय असते लाट साहेबांची मिरवणूक

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाहजहांपूरमध्ये लाट साहेबांच्या मिरवणुकीची परंपरा सुरू झाली. यामध्ये, इंग्रजांचे प्रतीक म्हणून, एका व्यक्तीला लाट साहेब बनवले जाते आणि म्हशीच्या गाडीतून फिरवले जाते. राग व्यक्त करण्यासाठी, यावेळी त्याला झाडूने मारले जाते. याचबरोबर त्या बूट आणि चप्पलांचा हार घातला जातो. ज्या व्यक्तीला लाट साहेब व्हायचे असते तो संमतीने मिरवणुकीत येतो, त्या बदल्यात त्याला ५० हजार रुपये दिले जातील.

Story img Loader