सॅमसंगने भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ लॉन्च केले आहेत. हे दोन्ही बजेट स्मार्टफोन असून यामध्ये 6 इंचाचा इन्फिनिटी डिस्प्ले आहे. दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर देण्यात आलं आहे, मात्र दोन्ही फोनच्या स्पेसिफिकेशनमध्ये थोडा फरक आहे. दोन्ही फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉस ऑडिओ टेक्नॉलजी देण्यात आली आहे.
या दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने एक इमोटिफाई फिचर दिलं आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे4+ ची किंमत भारतात 10,990 रुपये आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि गोल्ड कलरमध्ये मिळेल. तर सॅमसंग गॅलेक्सी जे6+ ची किंमत 15,990 रुपये असून ब्लू, ब्लॅक आणि रेड कलरमध्ये हा फोन उपलब्ध आहे. गॅलेक्सी जे4+ आणि गॅलेक्सी जे6+ सॅमसंग इंडियाच्या रिटेल आउटलेट्समध्ये, तसंच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सॅमसंग शॉप ऑनलाइन स्टोअरवर खरेदी करता येईल. 25 सप्टेंबपासून हा फोन ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. लॉन्च ऑफरअंतर्गत सॅमसंग कंपनी 11 नोव्हेंबरपर्यंत 990 रुपयांत वन-टाइम स्क्रीन रीप्लेसमेंट देत आहे.
Samsung Galaxy J4+ चे स्पेसिफिकेशन्स –
6 इंच एचडी+ (720×1480 पिक्सल) इन्फिनिटी डिस्प्ले
स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर
2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज
13 मेगापिक्सल सिंगल रिअर कॅमेरा
सेल्फीसाठी 5 मेगापिक्सल कॅमेरा
अॅन्ड्रॉइड 8.1 ओरियो
बॅटरी 3300 एमएएच
वजन 178 ग्रॅम
कनेक्टिविटी – 4जी VoLTE, सिंगल-बँड वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, ग्लोनास, एनएफसी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक
Samsung Galaxy J6+ स्पेसिफिकेशन्स –
6 इंच एचडी+ (720×1480 पिक्सल) इनफिनिटी डिस्प्ले है
स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसर
4 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज
दोन सेंसर असलेला 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
3300mAh बॅटरी
वजन 178 ग्रॅम
कनेक्टिविटी – 4जी VoLTE, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, एनएफसी, जीपीएस/ग्लोनास आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक
अॅन्ड्रॉइड 8.1 ओरियो