अ‍ॅपलचे घरचे मैदान असलेल्या अमेरिकेमध्ये सॅमसंगने आपला बहुप्रतिक्षित ‘गॅलक्सी एस४’ हॅण्डसेट लॉंच केला. ग्राहकांना प्रभावित करतील आणि आतापर्यंतच्या उपलब्ध हॅण्डसेटमध्ये नसलेली आणि तितकीच भन्नाट फिचर्स हे या नव्या हॅण्डसेटचे वैशिष्ट्य म्हणता येईल. न्यूयॉर्कमध्ये झालेल्या अतिभव्य कार्यक्रमात सॅमसंग मोबाईल कम्युनिकेशनचे प्रमुख जे. के. शिन यांनी हा हॅण्डसेट सादर केला.

या हॅण्डसेटमधील काही महत्त्वाचे फिचर्स पुढीलप्रमाणे…

* १३ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
* अवघ्या ४ सेकंदात या हॅण्डसेटमधून तब्बल १०० छायाचित्रे काढली जाऊ शकतात
* एस४ रियल टाइम ट्रान्सलेटरच्या माध्यमातून हॅण्डसेटमध्ये भाषांतराची सोय.
* आंतरराष्ट्रीय भाषांचे भाषांतर करणे शक्य
* आय ट्रॅकिंग फिचरमुळे कॅमऱयावरून आपले लक्ष हटल्यास आपोआप हा कॅमेरा बंद होईल आणि पुन्हा
* कॅमेऱयाकडे लक्ष गेल्यास कॅमेरा सुरू होईल. व्हिडिओ बघतानाही आपले लक्ष दुसरीकडे गेल्यास आपोआप व्हिडिओ पॉझ होईल
* ग्रूप प्लेमुळे सॅमसंगच्या इतर हॅण्डसेटमध्ये एकच गाणे एकाचवेळी वाजवले जाऊ शकते
* ग्लोव्हज घालूनही या हॅण्डसेटमधील टचस्क्रिन वापरता येईल
* १६, ३२ आणि ६४ जीबीची इंटरनल मेमरीचे पर्याय यामध्ये देण्यात आली आहे
* १०८० पिक्सलची हाय डेफिनेशनची स्क्रिन
* ८ कोअर प्रोसेसर