सॅमसंग कंपनी मागील काही दिवसांपासून नवनवीन मॉडेल सादर करुन आपल्या ग्राहकांना खुश करत आहे. ड्युल सिम कार्डसारखेच आता मोबाईलला दोन स्क्रीन असणार आहेत. सॅमसंग कंपनी लवकरच आपला हा नवीन फोन लाँच करणार आहे. हा फ्लिप फोन असणार आहे. या फोनचे नाव Samsung Galaxy W2019 असे आहे. या स्मार्टफोनची डिझाईन W2018 यासारखीच असणार आहे. यामध्ये ड्यूअल रियर कॅमराही असणार आहे.
W2018मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रैगन ८३५ प्रोसेसर होते, तर W2019मध्ये W2019 ८४५ प्रोसेसर असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. W2019 या सॅमसंगच्या फोनमध्ये ४.२ इंचाचे दोन फूल एचडी डिस्प्ले ( 1920 x 1080 पिक्सल) असणार आहेत. या फोनची बॅटरी तीन हजार वॅटची आहे. या स्मार्टफोनचे डाइमेंशन 132.9x63x2x17.3(mm) आहे.
सॅमसंगचा W2018 हा नवीन स्मार्टफोन पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. या फोनच्या खासियतबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, हा फोन टॅबलेटप्रमाणे काम करणार आहे. सॅमसंगचा फोल्ड होणारा स्मार्टफोनची निर्मीती करत बाजारात नवीन पर्याय उपलब्ध केला आहे. महत्वाचे म्हणजे सध्या हे फक्त प्रायोगिक तत्वावर करण्यात आले आहे. जर सॅमसंगच्या दोन्ही फोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास या दोन्ही फोनची अपडेट व्हर्जन बाजारात येण्याची शक्यता आहे.
यापूर्वी सर्व प्रथम सोनी कंपनीने ‘सीईएस २०१०’ मध्ये ‘ओएलईडी फोल्डेबल डिस्प्ले’ दाखल केला होता. ‘सीईएस २०१३’ मध्ये सॅमसंग कंपनीने अशाच प्रकारचा फोल्डेबल डिस्प्ले दाखल केला होता. मात्र, त्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती कंपनीने अद्याप तरी सुरू केलेली नाही.