नवी दिल्ली : सोमनाथपासून संभलपर्यंत असलेला लढा हा ऐतिहासिक सत्य जाणून घेण्यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी असल्याचे ‘ऑर्गनायझर’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या नियतकालिकात म्हटले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून अलीकडे झालेल्या वादाबाबत काँग्रेसवर टीकेची झोडही उठविण्यात आली आहे.

संरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अलीकडेच पुण्यात झालेल्या सहजीवन व्याख्यानमालेत बोलताना देशात होत असलेल्या मंदिर-मशीद वादाबाबत नापसंती व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ‘ऑर्गनायझर’मध्ये विस्तृत भाष्य करण्यात आले आहे. ‘‘उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक शहरात (संभलमध्ये) श्री हरिहर मंदिराच्या जागेवर आता बांधण्यात आलेल्या जामा मशिदीच्या सर्वेक्षणासाठी याचिका केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. यावरून होत असलेली चर्चा ही हिंदू-मुस्लीम वाद अशा छद्मा धर्मनिरपेक्ष लोलकातून न पाहता खरा इतिहास जाणून घेण्यासाठी तसेच सामाजिक न्यायासाठी सर्वांच्या सहभागाने आणि समजूतदारपणे यावर चर्चा झाली पाहिजे,’’ असे ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखात म्हटले आहे. ‘‘सोमनाथपासून संभलपर्यंत आणि त्यापुढेही दिला जात असलेला हा लढा धार्मिक वर्चस्वासाठी नसून ऐतिहासिक सत्य जाणून घेण्यासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि आपली राष्ट्रीय ओळख निश्चित करण्यासाठी आहे,’’ असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray : “आम्हाला ‘बटेंगे तो कटेंगे’ सांगणारे अशावेळी जातात कुठे?” बेळगावच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचा भाजपाला सवाल

हेही वाचा >>> Dabur Vs Patanjali : च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून डाबर आणि पतंजली भिडले! बाबा रामदेव यांच्या कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स

काँग्रेसवर टीका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कथितरीत्या अपमान केल्याची ओरड करणाऱ्या काँग्रेसनेच संविधान समितीच्या अध्यक्षांना कशी वागणूक दिली होती, याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध असल्याचे ‘ऑर्गनायझर’ने म्हटले आहे. डॉ. आंबेडकर हे जातिभेदाच्या मुळापर्यंत गेले आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांनी उपाय दिला, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

भारतातील मुस्लिमांनी हे लक्षात घेतले पाहिजे की ते इस्लामिक आक्रमणांचे बळी ठरले आहेत. त्यांचे पूर्वज हिंदूंमधल्याच एखाद्या पंथाचे होते आणि म्हणून त्यांनी द्वेषपूर्ण विचारसरणी नाकारली पाहिजे. – द ऑर्गनायझर

Story img Loader