पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. मलिकचा हा तिसरा विवाह आहे. शोएब मलिकने आपल्या लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामला शेअर करताच ही बातमी अचानक चर्चेत आली. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला घटस्फोट न देताच या दोघांचा विवाह झाला का? सानिया आणि शोएबचं नातं संपुष्टात आलं का? असे प्रश्न दोन्ही देशातील त्यांचे चाहते उपस्थित करत होते. त्यानंतर आता सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी या लग्नामागील सत्य समोर आणले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सानिया मिर्झाच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना ते म्हणाले की, त्या दोघांमध्ये (शोएब-सानिया) ‘खुला’ झालेला आहे. याचा अर्थ असा की, सानियाने शोएबला एकतर्फी घटस्फोट दिलेला आहे. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर घटस्फोटासंदर्भात एक पोस्ट टाकली होती. त्यामुळे घटस्फोटांच्या चर्चांना पेव फुटले होते.

हे वाचा >> सानिया मिर्झाचा संसार मोडला, शोएब मलिकने शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे त्याची तिसरी पत्नी सना जावेद?

खुला म्हणजे काय?

इस्लाम धर्मीयांच्या वैयक्तिक कायद्यात घटस्फोटाच्या ज्या पद्धती दिल्या आहेत. त्यात ‘खुला’ पद्धतीचा उल्लेख आढळतो. खुला पद्धतीत महिला आपल्या पतीशी चर्चा केल्यानंतर त्याला एकतर्फी घटस्फोट देऊ शकते. तलाक या पद्धतीनुसार पती आपल्या पत्नीपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतो. तर खुला म्हणजे पत्नीला आपल्या पतीपासून वेगळे व्हायचे आहे.

२०१० साली झाला होता विवाह

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा ही शोएब मलिकची दुसरी पत्नी होती. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबाद येथे या दोघांचा विवाह संपन्न झाला होता. ऑक्टोबर २०१८ साली त्यांना एक मुलगाही झाला. त्याचे नाव इझहान मिर्झा मलिक असे ठेवण्यात आलेले आहे. मागच्या काही वर्षांपासून या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी असल्याचे बोलले जात होते. मात्र त्याबद्दल दोघांनीही जाहीर वाच्यता केली नाही किंवा नात्यामधील तणाव बाहेर दाखवला नाही. त्यानंतर थेट शनिवारी शोएब मलिकच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे त्यांच्या चाहत्याना याची बातमी कळली.

आणखी वाचा >> ४२ वर्षीय शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी केलं तिसरं लग्न; दोघांच्या वयात आहे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांचं अंतर

शोएब मलिक याच्याप्रमाणेच सना जावेदचही हे पहिले लग्न नाही. २०२० साली तिने पाकिस्तानी गायक उमैर जसवालशी लग्नगाठ बांधली होती. मात्र नंतर दोघेही वेगळे झाले. शोएबशी लग्न झाल्यानंतर सना जावेदने इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या नावापुढे शोएब मलिक असे नाव जोडले आहे.

कोण आहे उमैर जसवाल?

खरे तर सना जावेदचे यापूर्वी एकदाच लग्न झाले आहे. सना जावेदने २०२० मध्ये गायक उमैर जसवालसोबत लग्न केले होते. पण सना-उमेरचे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि गेल्या वर्षी दोघांचा घटस्फोट झाला. उमेर जसवाल हा इस्लामाबादमधील पाकिस्तानी अभिनेता, गायक-गीतकार आणि संगीत निर्माता देखील आहे. तो कायस या रॉक बँडचा प्रमुख गायक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sania mirzas father reacts after shoaib malik marries pakistani actor sana javed kvg