पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. ९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शपथविधी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शपथविधीसाठी सफाई कर्मचारी, तृतीयपंथी आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांची उपस्थिती असणार असल्याचे सांगितले जाते. वंदे भारत आणि मेट्रो प्रकल्पासाठी काम करणारे रेल्वे कर्मचारी, केंद्रीय योजनांचे लाभार्थी आणि ‘विकसित भारत’ कार्यक्रमाचे ॲम्बेसेडर यांनाही शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले जाणार आहे. रविवारी राष्ट्रपती भवनमध्ये शपथविधी सोहळा संपन्न होईल.

एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, राष्ट्रपती भवनात ८००० पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. एनडीएमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना एनडीएचा नेता म्हणून निवडल्यानंतर शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. या सोहळ्याला दक्षिण आशियाई देशातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड, भुटानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आणि मॉरिशसनचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथही आपली उपस्थिती दर्शविणार आहेत.

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
Sadabhau Khot On Maharashtra Cabinet Expansion
Sadabhau Khot : “मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर निश्चित करा, आधी…”, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली ‘ही’ मागणी

Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदींचा शपथविधी कधी? ‘ही’ नवी तारीख चर्चेत; परदेशी पाहुण्यांनाही पंचतारांकित सोहळ्यासाठी आमंत्रण

२०१४ साली सार्क (South Asian Association for Regional Cooperation) परिषदेच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यानंतर २०१९ साली बिमस्टेक (Bay of Bengal Initiative for Multi-Sectoral Technical and Economic Cooperation) देशांच्या प्रतिनिधींनी शपथविधीचे निमंत्रण स्वीकारले होते. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्या टर्ममध्ये शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत.

मंगळवारी (४ जून) अठराव्या लोकसभेचे निकाल हाती आले. २०१९ साली भाजपाने ३०३ जागांवर विजय मिळविला होता. यावेळी भाजपाला ६३ जागांचा फटका बसला असून भाजपाचे संख्याबळ घटून २४० वर आले. २०१९ साली भाजपाप्रणीत एनडीएने ३५२ मतदारसंघात विजय मिळविला होता. यावेळी ही संख्याही घटली. एनडीएने यावेळी २९३ जागांवर विजय मिळवून बहुमताचा २७२ हा आकडा गाठला आहे.

कसे असेल मोदी कॅबिनेट 3.0 चे स्वरूप? नितीश-नायडूंच्या वाट्याला किती मंत्रिपद?

आता सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. एनडीएमध्ये सर्वात मोठे घटक पक्ष असलेल्या एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने १६ जागा तर नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) या पक्षाने १२ जागा मिळविल्या आहेत.

Story img Loader