अभिनेता संजय दत्त याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका दाखल करून शरण येण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्तला शस्त्रास्त्र कायद्याखाली न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. गेल्या महिन्यात न्यायालयाने २१ मार्च या खटल्याचा निकाल दिला होता.
शिक्षा भोगण्यासाठी शरण येण्यास संजय दत्तला एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. येत्या १९ एप्रिलला संजय दत्तला शिक्षा भोगण्यासाठी पोलिसांपुढे हजर व्हावे लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याने शरण येण्यासाठी आणखी सहा महिन्याचा कालावधी द्यावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. 

Story img Loader