भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेच्या खासदार स्मृती इराणी यांच्याविषयी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अनुदार उद्गार काढणारे काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांच्यावर भाजप भडकली आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी निरुपम यांच्यावर कारवाई करून माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण करताना एका वृत्तवाहिनीवर निरुपम आणि इराणी यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. त्या दरम्यान निरुपम यांनी ‘आप तो टीव्ही पर ठुमके लगाती थी, आज चुनावी विश्लेषक बन गई’ अशी टिप्पणी केली. त्यामुळे इराणी आणि भाजपचा भडका उडाला. निरुपम यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. सोनिया गांधी यांनी निरुपम यांच्या अभद्र आणि अशोभनीय आचरणावर कारवाई केली नाही तर भाजप सोनियांविरुद्ध निदर्शने करेल, असा इशारा पक्षाचे मुख्य प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी दिला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या रेणुका चौधरी यांनीही निरुपम यांच्या वक्तव्यावर खेद तसेच आश्चर्य व्यक्त केले. कुठल्याही व्यक्तीविषयी असे बोलणे अनुचित आहे. निरुपम यांनी असे विधान करायला नको होते. झालेला प्रकार खेदजनक आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे. इराणी यांच्याविषयी आपण केलेले विधान हे मूळ संदर्भापासून वेगळे केले जात आहे. लोकांनी पूर्ण चर्चा बघून त्याचा संदर्भ समजून घ्यावा, असे निरुपम यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा