काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेचं सदस्यत्व परत मिळाल्यानंतर संसदेत केलेल्या पहिल्याच भाषणात मोदी सरकारनं मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केल्याचा हल्लाबोल केला. मात्र, या भाषणापेक्षा त्यांनी लोकसभेतून जाताना केलेल्या एका कृतीची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. लोकसभेतून बाहेर पडताना राहुल गांधींनी सत्ताधारी बाकांकडे बघून ‘फ्लाइंग किस’ दिल्याचा दावा मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. त्यानंतर भाजपाच्या २२ महिला खासदारांनी याविरोधात लोकसभा अध्यक्षांना पत्रही लिहिलं आहे. मात्र, राहुल गाधींच्या त्या कृतीचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे.

नेमकं काय घडलं लोकसभेत?

लोकसभेत राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्यावर मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर बोलताना परखड शब्दांत टीका केली. मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या केली आहे असं म्हणतानाच जोपर्यंत तुम्ही मणिपूरमधला हिंसाचार थांबवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही भारतमातेचे खुनी असाल, असंही राहुल गांधी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले. भाषण झाल्यानंतर सत्ताधारी बाकांवरून होणाऱ्या टीका-टिप्पणीवर राहुल गांधींनी फ्लाइंग किस देणारे हावभाव केले. यावरून सध्या भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“केंद्र सरकारने ९ वर्षांत ९ सरकारे पाडली”, सुप्रिया सुळेंच्या आरोपांना अमित शाहांचं थेट प्रत्युत्तर; म्हणाले…

राहुल गांधींनी केलेली कृती आक्षेपार्ह आणि संसदीय वर्तनाला न शोभणारी असल्याची टीका भाजपाकडून केली जात आहे. त्यांच्या या कृतीविरोधात भाजपाच्या २२ महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करणारं पत्रही सादर केलं आहे. त्यामुळे भाजपाकडून या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली जात असताना दुसरीकडे विरोधी पक्ष राहुल गांधींच्या पाठिशी उभे राहिले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना राहुल गांधींच्या या कृतीचं समर्थन केलं आहे.

“जादू की झप्पी, तसं जादू का फ्लाइंग किस!”

“भाजपा कधी कोणत्या गोष्टीचं प्रदर्शन करेल, राजकारण करेल हे सांगता येत नाही. जंतरमंतरला महिला कुस्तीपटू आंदोलनाला बसल्या होत्या तेव्हा कुणी तिथे गेलं नव्हतं. राहुल गांधींनी द्वेष, सूड यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा किस दिला. जादू की झप्पी म्हणतो तसं जादू का फ्लाइंग किस. या ‘मोहोब्बत की दुकान’मधलं ते एक महत्त्वाचं शस्त्र आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींनी असे अनेक फ्लाइंग किस जनतेला, देशाला दिले आहेत. पण ज्यांना ममत्व उरलेलं नाही, त्यांना फ्लाइंग किस म्हणजे काय हे समजणार नाही”, असं म्हणत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

Story img Loader