एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्याची पूर्णपणे स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ( २४ जुलै ) स्पष्ट केलं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत भाष्य केलं आहे. सूर्य मावळणार आहे, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“देवेंद्र फडणवीस काय बोलतात, त्यापेक्षा विधानसभा अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आमचा विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस सर्वोच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश किंवा विधानसभा अध्यक्ष नाहीत. जेव्हा आम्ही बोलतो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, तेव्हा आमचं बोट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे असते,” असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा : “मणिपूर प्रकरणात अण्णा जागे आहेत हे दिसले, म्हणून…”, ठाकरे गटाने केली मागणी
“सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेबाबत दिलेल्या निर्णयाचं पालन विधानसभा अध्यक्षांनी केलं, तर फडणवीसांच्या बोलण्याला अर्थ राहत नाही. हे देवेंद्र फडणवीसांना पक्क माहिती आहे. शेवटी ‘देखल्या दिवा दंडवट’ ही मराठीत म्हण आहे. पण, सूर्य मावळणार आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदाराने सुनावलं; म्हणाले, “आमच्या घरात…”
“बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची चर्चा ती प्रसिद्ध होण्यापूर्वी सुरु होते. उद्धव ठाकरे बोलू लागतात तेव्हा शिवसेनेला संपवलं हे सांगणाऱ्यांच्या पोटात सर्वात आधी गोळा येतो,” असा टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.