काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली होती. यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल ‘एक्स’ ( ट्वीटर ) अपमानास्पद शेरेबाजी केली होती. यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे. महान देशाच्या पंतप्रधानांबद्दल दुसऱ्या देशातील मंत्र्यांनी चुकीचे शब्द वापरणं नागरिकांना अजिबात मान्य नाही. पण, भाजपानं याचा वापर राजकारणासाठी करून दिवे लावण्यास सुरूवात केली आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “मालदीवची घडामोडी आंतररराष्ट्रीय असल्याचं मी मानत नाही. देशाच्या पंतप्रधानांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत. राजकीय व्यक्ती म्हणून मोदींवर आम्ही टीका-टीप्पणी करतो. पण, मोदी या महान देशाचे पंतप्रधान आहेत.”

हेही वाचा : पंतप्रधान मोदींबाबत मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर मालदीवच्या महिला खासदार संतापल्या, म्हणाल्या, “लाजिरवाणे अन्…”

“भाजपानं राजकीय दिवे लावले”

“महान देशाच्या पंतप्रधानांबद्दल दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी काही चुकीचे शब्द वापरणे नागरिकांना अजिबात मान्य नाही. पण, भाजपानं याचा वापर राजकारणासाठी करून दिवे लावण्यास सुरूवात केली आहे. यावरून वाटतं लक्षद्वीपची एकमेव जागा जिंकण्यासाठी हे पूर्वनियोजीत तर नव्हतं ना?” अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली आहे.

हेही वाचा : “मालदीवशी व्यवसाय बंद करा”, भारतातील व्यावसायिकांच्या शिखर संघटनेचं आवाहन; मंत्र्यांच्या विधानांचा फटका देशाला बसणार?

“मालदीव फार लहान देश आहे”

“पंतप्रधान मोदींबाबत मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीप्पणीचा आम्ही धिक्कार करतो. हा काय आंतरराष्ट्रीय विषय असण्याचा भाग नाही. तसेच, यामुळे जागतिक युद्ध वगैरे होणार आहे, असंही नाही. मालदीव फार लहान देश आहे. तेथे गवताची पाती सुद्धा उगवत नाही. समुद्राच्या बेटांचा समूह असलेल्या मालदीवची लोकसंख्या तीन ते चार लाखच आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut on narendra modi lakshadweep loksabha maldives controversy ssa