लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं राजकीय वातावरण तापू लागल्याचं दिसत आहे. एकीकडे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतून नितीश कुमार बाहेर पडल्यामुळे विरोधकांना धक्का बसलेला असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांचा जोरदार प्रचार केला जात आहे. या पार्श्वभूमीवर देशात सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ईव्हीएम व चंदीगडमधील घडामोडींचा संदर्भ देत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.

“भारतीय जनता पक्ष डरपोक”

भारतीय जनता पक्ष हा एक डरपोक पक्ष आहे, अशी टीका संजय राऊतांनी यावेळी केली. “भाजपा हा डरपोक पक्ष आहे. लोकांमध्ये जायची त्यांच्यात हिंमत नाहीये. इव्हीएम किंवा चंदीगड पॅटर्न नसेल, तर भाजपा जिंकू शकत नाही” असं ते म्हणाले. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. “उत्तर प्रदेशच्या चंदौलमध्ये एका दुकानात २०० इव्हीएम मशीन मिळाल्या आहेत. तो भाजपाचा पदाधिकारी आहे. आसाममध्ये एका ट्रकमध्ये ३००हून जास्त इव्हीएम मशीन सापडल्या. तो ट्रकही भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याच्या नावावर आहे. हा काय खेळ आहे?” असा सवाल त्यांनी केला.

Sanjay Raut On Maharashtra Vidhan Sabha Election Result
Sanjay Raut : संजय राऊत यांचं वक्तव्य, “महाविकास आघाडी आहे, स्वबळावर…”
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा? (फोटो सौजन्य @इंडियन एक्स्प्रेस)
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दोनदा पराभव केला होता? काय घडलं होतं तेव्हा?
One Nation One Election Joint Parliamentary Committee
One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी जेपीसीची स्थापना; प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदेंसह ३१ सदस्यांचा समितीत सहभाग
One Nation One Election BJP
One Nation One Election : मोठी बातमी! भाजपा २० खासदारांना बजावणार नोटीस; नेमकं कारण काय?
Sanjay Raut on Chhagan Bhujbal
“भुजबळांचा वापर करणाऱ्यांनीच आज त्यांना…”, मराठा आरक्षण विरोधी आंदोलनावरून संजय राऊत यांची खोचक टीका
Mallikarjun Kharge criticizes Prime Minister Narendra Modi
भूतकाळात नव्हे वर्तमानात वावरा! खरगे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहात का? दिलीप वळसे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; भुजबळांबाबतही केलं मोठं भाष्य

मनसुखभाई व चंदीगड पॅटर्न!

दरम्यान,भाजपा आता मनसुखभाई किंवा चंदीगड पॅटर्ननेच निवडणुका लढवणार असल्याचं राऊत म्हणाले. “इव्हीएम बनवणाऱ्या सरकारी कंपनीवर (भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड) भाजपाचे चार संचालक नियुक्त केले गेले. इव्हीएममधला गुप्त कोड तिथेच तयार होतो. पण संचालकांपैकी बहुतेक संचालक गुजरातचे आहेत. २०२४ मध्ये कशा प्रकारे निवडणुका लढवल्या जातील, त्याची ही तयारी आहे. दोन पॅटर्न आहेत. एक मनसुखभाई पॅटर्न, जे इव्हीएम बनवणाऱ्या कंपनीचे संचालक झाले आहेत. दुसरा चंदीगड फॉर्म्युला. तिथे काँग्रेस व आपनं निवडणूक जिंकली. पण तरीही भाजपा हे मानायला तयार नाही. मतपत्रिकांचं अपहरण केलं गेलं आणि ते गादीवर बसले”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पालिकेचा अजब कारभार; फक्त सत्ताधारी आमदारांनाच दिला ५०० कोटींचा विकासनिधी, धक्कादायक प्रकार उघडकीस!

काय घडलं चंदीगडमध्ये?

दरम्यान, यावेळी संजय राऊतांनी चंदीगडमधील राजकीय घडामोडींचा दाखला दिला. “या देशात भाजपा सरळ लोकशाहीच्या मार्गानं कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही. ईव्हीएम हटली तर भाजपा गेली. इव्हीएम है तो मोदी है. चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत होतं. दोघांच्या मिळून २० जागा होत्या. भाजपाकडे १४ जागा होत्या. मतदान आप व काँग्रेसच्या बाजूने झालं. पण तरीही पीठासीन व्यक्तीनं ८ मतं बाद केली. विजयी होत असलेल्या काँग्रेस-आप युतीच्या महापौराला पराभूत दाखवून भाजपाचा महापौर विजयी ठरवला. हा चंदीगड पॅटर्न भाजपानं आणला आहे”, असं राऊत म्हणाले.

“आम्ही वाचलं होतं की सीतेचं अपहरण रावणानं केलं. पण चंदीगडमध्ये लोकशाहीरुपी सीतेचं अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केलं”, असा टोलाही त्यांनी लगावला.

Story img Loader